भाजपा कार्यालया समोर बॉम्ब स्फ़ोट..?

0
46

 

कॉलेज कट्टा न्यूज-
चंदीगडमधील सेक्टर ३७ येथील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यालयाबाहेर एक कमी तीव्रतेचा स्फोट झाला आहे.

आज १ एप्रील बुधवारी दुपारी चंदीगडमधील भाजपच्या प्रादेशिक कार्यालयाबाहेर हा स्फोट झाला.या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. मात्र, स्फोटामुळे कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या काही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे.
चंदीगड पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली असून फॉरेन्सिक टीम (FSL) घटनास्थळी पुरावे गोळा करत आहे.सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असून, प्राथमिक माहितीनुसार दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींनी हा स्फोट घडवून आणला असावा असा संशय आहे.प्राथमिक तपासात हा ‘क्रूड बॉम्ब’ (Crude Bomb) असावा असे संकेत मिळाले आहेत.सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण चंदीगडमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून संवेदनशील भागातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here