कॉलेज कट्टा विशेष:
नरेंद्र सोनारकर: देशात हिंदूराष्ट्र निर्मितीसाठी संघटित कट्टरवादी…धीरेंद्र शास्त्री यांचा मार्च,वाटल्या जाणाऱ्या तलवारी,फरसे…हिंदूंनी
चार पोरं करा असे वक्तव्य…चर्च मधील पादरींना धमक्या,क्रीसमस डे विरुद्ध सजावटीची तोड फोड…
या देशात कोण खतऱ्यात आहे? हा प्रश्न प्रलंबीत ठेवत चाललेला राज शिष्ठाचार…संविधान आणी कायद्या विरुद्ध जाऊन हिंदू राष्ट्राचे खुले समर्थन…यांच्यावर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे का दाखल होत नाहीत..? हिंदू राष्ट्राचे समर्थन करणाऱ्यांना कायद्यात असलेल्या देशद्रोहच्या कलमा लागू होत नाहीत का..?? जर पुन्हा खलीस्थान ची मागणी समोर आली तर..?दलितांनी दलितस्थान ची मागणी केली तर..?? मुस्लिमांनी मुस्लिमस्थान ची नव्याने मागणी केली तर..?? ख्रिस्थांनी या देशाचे नाव जेरुसीलम ठेवण्याची मागणी केली तर..? त्यांनाही मिळेल का सुट,कायदेशीर कचाट्यातून..?की देशद्रोही म्हणून फासावर लटकवले जाणार..?
अनेक मुद्दे आहेत.पण महाकवी रामदास आठवले साहेबांची बात वेगळी आहे…उद्या दस्तूरखुद्द विश्व भूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदूराष्ट्र समर्थक कसे होते,अशा आशयाची कविता महाकवी आठवले साहेबांनी लिहिल्यास नवल काय..?संविधान डॉ. आंबेडकरांनी न लिहिता बी.एन.राव यांनी लिहिले असे सडेतोड
बोलणाऱ्या,संविधान पायदळी तुडवत डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमांची होळी करणाऱ्या विरुद्ध एक अवक्षरही न काढणाऱ्या आठवलेंना अशा भयंकर वेळी कविता सुचतात..? पुण्याच्या भाजप कार्यालया समोर उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांना धरणे आंदोलन करायला लावणारे,भाजप ने उमेदवारी न दिल्यास समाजाला काय तोंड दाखवू?असा लाचार प्रश्न उपस्थित करणारे आणी विशेष म्हणजे उमेदवारी मिळाल्यास भाजप च्या निवडणूक चिन्हावर उमेदवारांना लढवण्याची तयारी ठेवणाऱ्या आठवले साहेबांना कविता सुचतातच कशा..??
वाचा त्यांच्याच शब्दात त्यांची कविता…
“मी आलेलो आहे वर्दीच्या डोममध्ये, पण मी नाही डोम कावळा…
पण तर मी आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा मावळा,
माझा रंग आहे सावळा,
पण मी राजकारणात नाही
उद्धव ठाकरेंसारखा बावळा…
मी नाही नाराज,
मी राहिलो नाराज तर
मुंबईत येईल कसे आपलं राज..?
मी आलेलो आहे आज…
कारण मुंबईच्या महापौर पदावर
चढवायचा आहे ताज !
एकत्र आले आहेत, फडणवीस आणि शिंदे,
त्यांनी बंद केले राज आणि उद्धव यांचे धंदे..!”
-महाकवी रामदास आठवले
एकंदरीत बाबासाहेबांच्या चिरकाल आणी क्रांतिकारी विचारांना आपल्या सोई नुसार रंग फासून मागच्या दारातून खासदारकी आणी मंत्रिपद भोगणाऱ्या आठवले साहेबांना बाबासाहेंच्या विचारांची चिंता आहे की फडणवीस शिंदेंची युती सशक्त बनवी ही चिंता आहे?,यावर समाजिक मंथन होने गरजेचे आहे…
भविष्यात हिंदूराष्ट्र होवो न होवो,पण आठवले साहेबांची मागच्या दारातील खासदारकी आणी मंत्रिपद कायम राहो हिच कॉलेज कट्टा टीम कडून हार्दिक सदिच्छा..!
त्यांचा कवितेचे उत्तर त्यांच्याच भाषेत द्यायचे झाल्यास—
“कार्यकर्त्यांचे रक्त शोशून
तुम्ही लावली आहे चळवळीची किंमत,
मोदी शहांना जाब विचारण्याची आहे का तुमच्यात हिम्मत..?
गप्प गुमान तुम्हाला…
मनुवादाची लागली खाज आहे,
लाचारी,,,आणखी किती लाचारी…?
फक्त सत्तेचा माज आहे..??
तुम्ही नाराज असाल की नाही
कोणाला देणं घेणं नाही,
लाचारीचा कळस तुम्ही…
तुमचे व्यक्तित्व देते ग्वाही..!
महापौर सत्ताधारी बसला तर
तुमची विदूषकी जाईल का..?
नीळा झेंडा स्वाभिमानाने
‘जय भीम’ घोषणा देईल का..?”




