चंद्रपूरात भाजप-काँग्रेस या दोन्ही पक्षांची राजकीय कोंडी…शिवसेने (उबाठा) ला महापौर पदाची संधी..?

0
100

 

 

कॉलेज कट्टा न्यूज चंद्रपूर- महापालिका निवडणुकीत आकड्यांच्या खेळात काँग्रेस सरस ठरली असली तरी सत्तेची चावी शिवसेना (उबाठा) आणी वंचित बहुजन आघाडी या मित्रपक्षाच्या हातात असल्याने काँग्रेस-भाजप यांच्यातील चुरस सत्ता हस्तगत करण्यासाठी कायम राहील का?हा प्रश्न इथे उल्लेखनीय झाला आहे. पालिका निवडणुकीत काँग्रेस ने सर्वाधिक जागा जिंकत महापौर पदावर हक्क सांगणे सुरु केले असले तरी,भाजप ने अजूनही पराभव पत्कारलेला नाही.आकड्यांची जुळवा जुळव कशी करायची ते आपापल्या परीने दोन्ही पक्ष कामाला लागले असले तरी या महापौर पदाची चावी खिशात घेऊन फिरणारे शिवसेना (उबाठा) आणी वंचीत बहुजन आघाडीचे 2, असे आठ नगर सेवक या महापौर पदाच्या लढतीत किंग मेकर ची भूमिका बजावणार आहेत.

             काय आहे संख्या बळ?

काँग्रेस 30,भाजप 23,शिवसेना (शिंदे गट)                   1,शिवसेना (उबाठा)6,वंचित 2,एमआयएम                   1,इतर 2 असे पक्षनिहाय संख्या बळ असून                   काँग्रेस- भाजप या दोन्ही पक्षाकडे बहुमत                     नसल्याने त्यांना कुठल्या कुबड्यांची गरज                     पडणार आहे.नेमकी हिच संधी हेरून उबाठा ने              महापौर पदावर आपली दावेदारी ठोकली                      आहे. महापौरपद  दिल्यास काँग्रेस भाजप                     पैकी कोणत्याही पक्षासोबत जाण्याची तयारी                उबाठा ने दर्शविल्याने परंपरा गत शत्रू                            असलेल्या भाजप काँग्रेस पुढे मोठे आव्हान                    उभे ठाकले आहे.

         रोस्टर निघाल्यावर उमेदवार नसल्यास काय..?

भाजप काँग्रेस दोन्ही पक्षाकडून महापौर पदावर              दावा ठोकला गेला असला तरी रोस्टर काय                    निघते,यावर सर्व राजकीय पक्षाचे भवितव्य                   अवलंबून आहे…पुढल्या 24 तासात बऱ्याच                गोष्टी स्पष्ट होणार आहे.दरम्यान नाईलाजाने                  उबाठा चे समर्थन घ्यायचे झाल्यास काँग्रेस-                    भाजप ला संख्याबळ असतानाही उबाठा ला                  माहपौर पद द्यावेच लागणार आहे हे विशेष!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here