बल्लारपूर नगर परिषदेच्या स्थायी समिती सदस्यांची निवड संपन्न

0
68

 

कॉलेज कट्टा न्यूज
बल्लारपूर- नुकत्याच पार पडलेल्या पालिकेच्या विशेष सभेत स्थायी समिती पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
नगरपरिषदेची ही विशेष बैठक दि 20 जाने. रोजी दुपारी 4 वाजता राजे बल्लाळशाह नाट्यगृह येथे पीठासीन अधिकारी व मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली सभापति आणि स्थायी समिती सदस्यांची निवड करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. या विशेष बैठकीत, नवनिर्वाचित उपाध्यक्ष देवेंद्र आर्य यांची स्वच्छता, वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या पदसिद्ध सभापति म्हणुन एकमताने निवड करण्यात आली. तसेच अब्दुल करीम शेख यांची सार्वजनिक बांधकाम, इस्माईल ढाकवाला यांची पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण, पवन मेश्राम यांची विकास आणि नियोजन, प्रियंका थुलकर यांची शिक्षण व मेघा भाले यांची महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभापतिपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच माजी नगराध्यक्ष छाया मडावी, लखन सिंह चंदेल आणि करुणा नरसिंह रेब्बावर यांची स्थायी समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. नगराध्यक्ष अलका अनिल वाढई, उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, मुख्याधिकारी विशाल वाघ आणि विशेष सभेला उपस्थित असलेल्या सर्व नगरपरिषद सदस्यांनी नवनिर्वाचित सभापति आणि स्थाई समिति सदस्यांना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here