20 व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ कवी लेकनाथ यशवंत…

0
96

 

कॉलेज कट्टा प्रतिनिधी
नागपूर-नांदेड येथे फेब्रुवारी २०२६ च्या अखेरीस २० वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जाणार आहे, ज्याचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवी आणि लेखक लोकनाथ यशवंत (नागपूर) यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनाच्या माध्यमातून प्रस्थापित सामाजिक व्यवस्थेच्या विरोधात आणि शोषित जगण्याला बळ देणारे साहित्य मांडले जाईल, ज्यासाठी डॉ. भगवंत क्षीरसागर यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे.

विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने नांदेड येथे आयोजित २० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी, लेखक, अनुवादक लोकनाथ यशवंत (नागपूर) यांची निवड करण्यात आली यापूर्वी बाबुराव बागुल, वाहरु सोनवणे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. अजिज नदाफ, आत्माराम कनीराम राठोड, कॉ. तारा रेड्डी, तुळसी परब, डॉ.आ.ह. साळुंखे, संजय पवार, जयंत पवार, उर्मिला पवार, डॉ. श्रीराम गुंदेकर, डॉ. प्रतिभा अहिरे, विमल मोरे, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. आनंद पाटील, गणेश विसपुते, चंद्रकांत वानखेडे, डॉ. वासुदेव मुलाटे, डॉ. अशोक राणा यांसारख्या सर्जनशील साहित्यिक, समीक्षक, अनुवादक, पत्रकार, इतिहासकार, नाटककार यांनी विद्रोही साहित्य संमेलनाची अध्यक्षपदे भूषवली आहेत.

लोकनाथ यशवंत यांच्या अध्यकपदी नियुक्ती झाल्याने विदर्भातील साहित्यिक कवींना विशेष आनंद झाला असून कादंबरीकार पवन भगत,नरेंद्र सोनारकर,पुरोगामी साहित्य संसद राज्य अध्यक्षा ऍड. योगिता रायपूरे,सीमा भासारकर,संगीता घोडेस्वार,विजय भसारकर
नागेश रत्नपारखी,आनंद रामटेके यांनी लोकनाथ यशवंत यांचे अभिनंदन केले आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here