राष्ट्रगीता पूर्वी ‘वंदे मातरम’ अनिवार्य-केंद्रसरकारचा निर्णय….

0
50

 

कॉलेज कट्टा न्यूज:
चंद्रपूर-केंद्र सरकारने सरकारी कार्यक्रम, शाळा आणि महत्त्वाच्या सोहळ्यांमध्ये राष्ट्रगीत (जन गण मन) गाण्यापूर्वी ‘वंदे मातरम्’चे पूर्ण ६ कडवे (सुमारे ३ मिनिटे १० सेकंद) गाणे किंवा वाजवणे अनिवार्य केले आहे. गृह मंत्रालयाने हा नवीन प्रोटोकॉल जारी केला असून, यानुसार राष्ट्रध्वज फडकवताना आणि राष्ट्रपतींच्या उपस्थितीत वंदे मातरमचे गायन बंधनकारक असेल..वंदे मातरम् राष्ट्रगीतापूर्वी अनिवार्य करण्यात आले असून,याचा कालावधी: ३ मिनिटे १० सेकंद (६ कडवे) ध्वजारोहण,अधिकृत सरकारी कार्यक्रम यात या राष्ट्रीय गीताला अनिवार्य करण्यात आले आहे.२४ जानेवारी १९५० रोजी संविधान सभेने ‘वंदे मातरम’ला ‘जन गण मन’च्या बरोबरीने राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला होता हा निर्णय ‘वंदे मातरम’च्या १५० व्या वर्षाच्या निमित्ताने. केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे.

कधी झाली वंदे मातरम ची सुरवात?
‘वंदे मातरम्’ हे गीत सुरुवातीला स्वतंत्र रचनेच्या स्वरूपात तयार करण्यात आले होते. नंतर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या 1882 साली प्रकाशित झालेल्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत त्याचा समावेश करण्यात आला. 1896 मध्ये कोलकाता येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी प्रथमच हे गीत गायले. 7 ऑगस्ट 1905 रोजी राजकीय घोषवाक्य म्हणून ‘वंदे मातरम्’चा पहिल्यांदा वापर करण्यात आला. पुढे 1950 साली संविधान सभेने या गीताला भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here