राहुल गायकवाड यांचे अन्न त्याग आंदोलन दडपण्याचा प्रयत्न..?

0
98

 

कॉलेज कट्टा न्यूज-
बल्लारपूर (नरेंद्र पिंगे): महत्वपूर्ण मागण्या घेऊन अन्न त्याग आंदोलनाला बसलेल्या वरिष्ठ पत्रकार राहुल गायकवाड यांचे आंदोलन मागण्या पूर्ण होण्या अगोदरच दडपण्याचा शासन प्रशासनाचा प्रयत्न असल्याची विश्वस्नीय माहिती असून,फक्त अतिक्रमण च्या मुद्यावरून लेखी आश्वासन देऊन हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती मिळाली असून,दिनांक 17 मार्च रोजी दुपारी 11 वाजता पासून डॉ. आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ. सुरु असलेल्या या आंदोलनाची प्रशासनाने धास्ती घेतली आहे.

काय आहेत प्रमुख मागण्या
1. शहरातील वाढत्या अतिक्रमणावर तात्काळ कारवाई करून ते हटवण्यात यावे.
2. शहरातील 31 बट्टे जमीन या ठिकाणी बिल्डरने केलेल्या अतिक्रमणामुळे महाराष्ट्र शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला असून या प्रकरणाची सीआयडी मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.
3. विसापूर जवळील 69 बट्टे जमीन, जी विनोबा भावे यांच्या आंदोलनातून भूमिहीनांना देण्यात आली होती, ती बिल्डरांनी कोट्यवधी रुपयांना विक्री करून शासनाचा मोठा महसूल बुडवला आहे. या प्रकरणाचीही सीआयडी चौकशी करण्यात यावी.
4. पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार वाढत असून, संपूर्ण चौकशी होईपर्यंत पत्रकारांवर गुन्हे दाखल करू नयेत.
5. पत्रकार रमेश निषाद यांना जीवे मारण्याची धमकी देऊन अश्लील शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात लावलेली आयपीसी कलमे रद्द करून पत्रकार सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात यावी.
6. सुरजागड येथून मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी.

एका पत्रकाराला अन्नत्याग आंदोलनाची गरज का..?
लोकशाहीत चौथा स्तंभ म्हणून ज्याच्याकडे समाज बघतो त्या पत्रकाराला आंदोलनाचा मार्ग पत्कारावा लागत असेल तर सामान्यांचे काय?असा प्रश्न उपस्थित होत असून,फक्त अतिक्रमण हटवण्याचे लेखी आश्वासन देऊन पालिका प्रशासन हे आंदोलन गुंडाळून लावण्याचा प्रयत्न करणार आहे.दरम्यान वरील पाचही मागण्या महत्वपूर्ण असून,त्या मागण्या पूर्ण झाल्या शिवाय आंदोलन मागे घेणार नाही,अशी भूमिका गायकवाड यांनी घेतली आहे.मात्र लेखणीचे सामर्थ्य सोबत असतांना एका पत्रकाराला आंदोलन करावे लागत असेल तर प्रशासन किती निष्ठुर आहे,अशी जन सामान्यात चर्चा आहे.

पाचही मागण्या पूर्ण झाल्या शिवाय आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नका- नरेंद्र सोनारकर
पत्रकार राहुल गायकवाड यांच्या सर्व मागण्या रास्त असून प्रशासन मात्र या आंदोलनाने हादरले आहे.मात्र 46 तासात हे आंदोलन गुंडाळण्याचा प्रशासनाचा कट आहे.कुठल्याही परिस्थितीत मागण्या पूर्ण न करता हे आंदोलन बळजबरीने गुंडाळल्या गेल्यास याचे तीव्र पडसाद महाराष्ट्र भर उमटेल असा इशारा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here