बल्लारपूर शहरातील अतिक्रमणावर फिरणार कायद्याचा बुलडोझर..!
कॉलेज कट्टा न्यूज
बल्लारपूर-नगर परिषद बल्लारपूर च्या वतीने शहरातील वाढते अतिक्रमण ६ एप्रिल पूर्वी काढून घेण्याची सक्त ताकीद देण्यात आली असून,स्वतःहून अतिक्रमण न काढल्यास कोणतीही पुर्वसुचना न देता संबंधित अतिक्रमण मालमत्तेसह काढुन टाकण्यात येईल. तसेच सदर कार्यवाही साठी येणारा सर्व खर्च संबंधित अतिक्रमणधारकांकडुन वसुल करण्यात येईल.असे नगर परिषदेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.
शहरातील अतिक्रमणचे प्रमाण वाढले असुन नागरिकांकडुन वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत.त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना तसेच व्यावसायिक दुकानदारांना या प्रसिद्धी पत्रका मार्फत सक्त सुचना देण्यात येत आहे की, बल्लारपूर शहरातील रहदारी रस्त्यांच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी व नालीवरील करण्यात आलेले सर्व प्रकारचे अतिक्रमण म्हणजेच स्थायी अथवा तात्पुरती बांधकामे सोमवार दिनांक 06.04.2026 पुर्वी स्वः खर्चाने काढुन टाकावीत,अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे.
नगर परिषद प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार कोणतीही पुर्वसुचना न देता संबंधित अतिक्रमण मालमत्तेसह काढुन टाकण्यात येईल. तसेच सदर कार्यवाही साठी येणारा सर्व खर्च संबंधित अतिक्रमणधारकांकडुन वसुल करण्यात येईल.
याशिवाय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती/व्यावसायिकांविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. शहरातील सुव्यवस्था वाहतुक सुलभता व स्वच्छता अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.




