विद्यार्थ्यांच्या मनात जातीच्या उच्च निचतेचे विष कालवणाऱ्यावर कठोर कारवाई करा

0
70

कॉलेज कट्टा ब्युरो-

यवतमाळ येथे इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता आणि निकालाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेत टार्गेट पीक अप्स संस्थेमार्फत विद्यार्थ्यांकडून सराव मोहीम राबिविली होती. यात जवळपास 24 विद्यार्थी सराव करीत होते.दरम्यान

या टार्गेट पीक अप्सच्या 8 विच्या दुसऱ्या ऑनलाइन सराव चाचणीच्या एका प्रश्न पत्रिकेत जातीच्या श्रेष्ठत्वातून विचारण्यात आलेला प्रश्न महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला काळिमा फसणारा असून चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या मनात जातीचे विष कालवणारा असल्याने प्रश्नपत्रिका निर्माण करणाऱ्या सबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांनी केली आहे.

या प्रश्न ऑनलाइन प्रश्न पत्रिकेत इयत्ता 8 च्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नावलीत “उच्च जातीचे नाव काय?” असा प्रश्न विचारण्यात आला. यामुळे प्रश्न पत्रिका निर्माण करणाऱ्यांनी मुद्दाम होऊन विद्यार्थ्यांच्या मनात जातीच्या उच्च निचतेचे विष कालवण्याचे पाप केल्याने संबंधिताला कोणत्याही परिस्थितीत माफ केल्या जाऊ नये,असेही सोनारकर यांनी म्हंटले आहे.एकीकडे शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणी पुरोगामी महाराष्ट्राचा उदोउदो करायचा आणी असले जातीय कारस्थान रचून विद्यार्थ्यांच्या मनात जातीयतेचे विष कालवायचे मग जातीय निर्मूलन कसे करणार, असा प्रश्नही सोनारकर यांनी उपस्थित केला आहे.

ही परीक्षा 22 फेब्रुवारीला होणार आहे.त्यापूर्वी जातीच्या उच्च निचतेचा प्रश्न असलेली प्रश्न पत्रिका तयार करणाऱ्या संबंधितावर मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी कारवाई करावी अन्यथा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ राज्य भर निदर्शने करेल असा ईशारही प्रसिद्धी पत्रकाशेवटी देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here