CJI गवई यांच्यावर बुट फेकणाऱ्या राजेश किशोर यांच्यावर चप्पल हल्ला…

0
92

CJI गवई यांच्यावर बुट फेकणाऱ्या राजेश किशोर यांच्यावर चप्पल हल्ला…

कॉलेज कट्टा ब्युरो-
६ ओक्टोंबर रोजी CJI बी.आर.गवई यांच्यावर बुट फेकून अचानक चर्चेत आलेले वकील राकेश किशोर यांना कोर्ट परिसरात एका वकीलाने चपलेने हल्ला केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.व्हिडिओमध्ये एक वकील अचानक राकेश किशोर यांच्यावर चपलेने हल्ला करताना दिसतो. हल्ल्यादरम्यान ते हल्लेखोराला विचारताना दिसतात, “तू कोण आहेस, मला का मारतो आहेस?” हल्ल्याला उत्तर देताना त्यांनी हात चलावत प्रतिकारही केला. काही क्षणांनी राकेश किशोर जोरात “सनातन धर्म की जय हो” असा नारा देताना ऐकू येतात.

हल्लेखोराचे चेहरा व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत नसला तरी हल्ला अचानक झाल्याचे दिसून येते. राकेश किशोर यांनी देखील स्वतःचे संरक्षण करत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.
आजूबाजूला उपस्थित असलेल्या वकिलांनी आणि इतरांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

शाहदरा बार असोसिएशनचे महासचिव नरवीर डबास यांनी सांगितले की, दोन वकिलांमध्ये वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून कोणत्याही बाजूने अजून तक्रार दाखल केलेली नाही.

राजेश किशोर यांच्यावर कोणत्या कारणाने हल्ला करण्यात आला? हे अध्याप स्पष्ट झाले नसले तरी सनातनी मानसिकतेतून CJI गवई यांच्यावर बुट फेकल्याचा बदला म्हणून एका वकीलाने राजेश किशोर यांना चपलेले बदडल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here