पुतळे बोलतात जेव्हा…

0
208

 

माणसाच्या विचारातून
हद्दपार झालेले
कावळ्यांनी टोचा मारून मारून
रक्तबंबाळ झालेले
पुतळे बोलतात जेव्हा…

पुतळे बोलतात जेव्हा आपसात
तेव्हा गेले शब्द माझ्या कानात
झोपेल भयमुक्त जनता म्हणून
केला हा एवढा अट्टाहास..!

वेगळेच रुप आले
या जयंती पुण्यतिथीला
प्रकाशमय समाजात नेला
कोणी,दीप अंधश्रद्धेचा…

अभ्यास नाही आमुच्या तरुणांचा
या देशाच्या संविधानाचा
देश विकण्यासाठी झाले
सर्व पक्षी भक्षक
नाही उरला संविधानाचा रक्षक…

परत वाट बघू नका
माझ्या परत येण्याची
अपुरेच आपण भविष्य घडविण्यास
पेटवा मशाल ही ज्ञानाची…

एकमेकांत प्रेमाचे झरे वाढवा
नका ठेवू मनात भाव कडवा
तरच होईल साजरा
येथे महापरिनिर्वाण दिन माझा…

प्रा.शुभांगी उत्तमराव मोहितकर
एफ.ई.एस.गर्लस.ज्यु.काॅलेज, चंद्रपूर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here