कॉलेज कट्टा ब्युरो-
खा.प्रतिभा धानोरकर यांनी संसदेत चंद्रपूर जिल्यातील जनतेसाठी पुणे- मुंबई रेल्वेगाड्या नियमीत सुरु करण्याची मागणी केली.संसद पटलावर बोलतांना चंद्रपूरकरांच्या समस्या मांडल्या. चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो, जो महाराष्ट्राची ‘ब्लॅक सिटी’ म्हणून प्रसिद्ध आहे, जिथे वीज, कोळसा आणि पेपर मिलचे मोठे उद्योग आहेत.
इतके महत्त्वाचे केंद्र असूनही, राज्याची राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे या शहरांसाठी चंद्रपूरहून थेट एकही ट्रेन उपलब्ध नाही, ही मोठी शोकांतिका असल्याचे सांगत रेल्वेमंत्र्यांना विनंती केली आहे की, मुंबई-पुण्यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी जाणाऱ्या हजारो विद्यार्थी, व्यापारी आणि रुग्णांसाठी तातडीने चंद्रपूर ते पुणे आणि चंद्रपूर ते मुंबई अशा दोन नवीन ट्रेन्स उपलब्ध करून द्याव्यात अशी जोरदार मागणी केली आहे.




