चिखलदऱ्यात थरार…20 प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी सुमित ने दिली प्राणाची आहुती…

0
450

कॉलेज कट्टा: चिखलदरा/चंद्रपूर-
चंद्रपूरहून चिखलदऱ्याला फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या ट्रॅव्हलरमध्ये प्रवासादरम्यान एक महिला प्रवाशाला मळमळ सुरु झाली. त्यामुळे चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले. मात्र, हँडब्रेक पुरेशा प्रमाणात न लागल्याने घाटातील उतारावर वाहन अचानक पुढे सरकू लागल्याचे लक्षात येताच चालकाने धावत जाऊन वाहन रोखण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने, त्याच प्रयत्नात तो वाहनाखाली सापडला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, सदर ट्रॅव्हलर सुमारे 20 फूट खोल दरीच्या दिशेने जाताना 10 फूट अंतरावर असलेल्या झाडाला अडकली. या दुर्घटनेत चालकाने स्वतःचा जीव गमावून अनेक प्रवाशांचे प्राण वाचविल्याने या वाहनाने चिखलदरा येथे गेलेल्या सर्व प्रवाशांना दुःखाचा मोठा हादरा बसला आहे.सुमित वनकर (34) रा.नागिणाबाग चंद्रपूर असे त्या दुर्दैवी चालकाचे नाव आहे.

वाहन रस्त्याच्या कडेला थांबविल्यानंतर काही क्षणातच उताराच्या दिशेने ट्रॅव्हलर
पुढे सरकत असल्याचे सुमीतच्या लक्षात आले. तत्काळ धोका ओळखून त्याने धावत जाऊन वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या झटापटीत त्याचा पाय चाकाखाली आल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला आणि जागीच कोसळला. त्याच वेळी ट्रॅव्हलर दरीकडे झेपावत दोन झाडांच्या मधून जात तिसऱ्या झाडाला अडकली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि वाहनातील सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर पडले.

घटनेची माहिती मिळताच चिखलदरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुरेश राठोड, सुरेश दहीकर, हर्षल काळे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

या दुर्दैवी अपघाताची बातमी मिळताच चंद्रपूरात शोककळा पसरली.सुमितच्या कुटुंबंियांवर आभाळ कोसळले…सुमीत वनकर यांनी अखेरपर्यंत प्रयत्न करत स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवाशांचा जीव वाचविल्याने त्यांच्या त्याग आणी बलिदानामुळे ही दुःखद बातमी समजलेल्या प्रत्येकांच्या डोळ्यांत आश्रुंनी गर्दी केली आहे.

बातमी लिहित्सोवर सुमित चा मृत देह चंद्रपूरात पोहचला नव्हता.रात्रौ 10 पर्यंत चंद्रपूर येथील भिवापूर स्मशानभूमीत सुमितच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.कॉलेज कट्टा टीम सुमितच्या बलिदानाला वदंन करत सुमितच्या अपघाती निधनाने त्यांचे कुठुंब,मित्र,आणी आपटेष्ठांवर कोसळलेल्या आभाळाएवढ्या दुःखात सहभागी आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here