कॉलेज कट्टा-
चंद्रपूर येथील पहिली आंतरराष्ट्रीय व्हॉली बॉल खेळाडू कु. सखी पांडुरंग दोरखंडे हिची २०२५ मधे चिन येथे झालेल्या अंडर १५ वर्ल्ड स्कूल व्हॉली बॉल चॅम्पियनशिप साठी निवड झाली असता तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते,हे दौदीप्यमान यश संपादन करत कु.सखीने जिल्हा,राज्याचेच नव्हे देशाचा गौरव वाढवीला आहे.”मेहनत,जिद्द,चिकाटी आणी सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे एकदिवस यशाचे आभाळ स्वतः खाली झुकून आलिंगण देते” असा संदेश देत कु.सखीने यशाचे शिखर पदाक्रांत केले आहे… त्याप्रित्यर्थ दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा स्टेडियम मित्र परिवाराच्या वतीने तिच्या आगमना प्रित्यर्थ भव्य स्वागत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित राहून कु. सखी दोरखंडे हिचा सत्कार केला, याप्रसंगी क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळाडू,समाजिक काययकर्ते स्वागत रॅलीत मोठ्या प्रमाणात उपस्थित होते…
कॉलेज कट्टा न्यूज च्या वतीने कु.सखी दोरखंडे च्या घवघवीत यशाला सेल्युट…तिच्या उज्ज्वल आणी यशस्वी भवितव्यासाठी कोटी कोटी मंगल कामना…..




