बिरबलाची खिचडी शिजेल पण घरकुलासाठी निधी मिळत नाही-आ. सुधीर मुनगंटीवार

0
139

 

कॉलेज कट्टा न्यूज
नागपूर- ग्रामीण भागातील गरीब, भटक्या व विमुक्त बांधवांच्या हक्कांच्या घरकुला साठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अर्धातास चर्चे दरम्यान आ.सुधीर मुनगंटीवार यांनी निधीच्या दिरंगाई विरुद्ध जोरदार हल्ला चढवत भर थंडीत सभागृहाला घाम फोडला…
ग्रामीण भागातील कुटुंबांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांच्या निधीची चातक पक्षा सारखी वाट बघावी लागते.कापूस कोंड्याची गोष्ट संपेल पण तुमचा निधी येत नाही,बिरबलाची खिचडी शिजेल पण तुमचा निधी येत नाही,चिऊ ताईची गोष्ट संपून दरवाजा उघडला जाईल पण तुमचा निधी येत नाही…अशा शब्दात त्यांनी राज्य शासनाच्या कामाचलवू वृत्ती वर गंभीर ताशोरे ओढले.

ग्रामीण भागातील भटक्या,विमुक्त जाती जमातीतील शेवटच्या पंगतीतील लोकांना हक्काचे घरकुल मिळावे यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरु करण्यात आली.पण निधी अभावी जनतेला वाट बघण्याशिवाय पर्याय नाही.”बोलाचीच कडी, आणी बोलायचाच भात” अशी या योजनेची गत झाली असून आज घडीला चंद्रपूर जिल्ह्याला या घरकुल योजनेसाठी 96 कोटी 36 लाख 42 हजार 400 रुपयांच्या निधीची गरज असल्याची जोरदार मागणी मुनगंटीवारांनी सभागृहात केली.”भारत माता माझी आई,डोकं ठेवायला जागा नाही” अशी विदारकता मांडत त्यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. मुंबईच्या लोकांसाठी सरकारकार कडे 11 लक्ष कोटी रुपये आहेत,आणी भटक्या विमुक्तांसाठी 96 कोटी नसेल तर अधिकाऱ्यांनी कोरड्या विहरीत जीव द्यावा अशी बोचरी टिकाही त्यांनी केली.मंजूर घरकुल योजनेचे घरकुल दुसऱ्या योजनेतून देऊ म्हणता,हे काय मंत्र्याचे खाते आहे का,दर सहा महिन्यांनी बदलायला..? अशा प्रशांनी त्यांनी खरपूस समाचार घेतला.

या अर्धा तास चर्चे दरम्यान यशवंतराव चव्हाण घरकुल येजनेचे नाव बदलून ‘पंतप्रधान आवास योजना’ असे करण्यात आल्याचे सांगत ग्रामविकास मंत्र्यांनी चंद्रपूर जिल्ह्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला जाईल असे सभागृहाला सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here