आमदार सुधीर मुनगंटीवारांचा ड्रीम प्रोजेक्ट प्रत्यक्ष साकारला…
कॉलेज कट्टा (नरेंद्र सोनारकर)
चंद्रपूर-जिल्ह्यात कॅन्सर सारख्या भयंकर रोगाने हळू हळू पंख पसरणे सुरु केले असतांना विदर्भ आणी जिल्ह्यातील नागरिकांना सर्व सोयी युक्त अद्यावत कॅन्सर हॉस्पिटल व्हावं हा निर्धार मनात बाळगून जन सेवेचे व्रत घेतलेल्या आ.सुधीर मुनगंटीवार यांनी सदनशीर आयुध वापरून रुग्ण सेवेचा एक ड्रीम प्रोजेक्ट मनात बालगला…आणि आज हा ड्रीम प्रोजेक्ट सकार होतांना त्यांचे मन आनंददाने भरून आले…
कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी चंद्रपूरमध्ये आज आशेच्या नव्या अध्यायाचा शुभारंभ झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या शुभहस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर रुग्णालयाचे लोकार्पण झाले. या क्षणी मुनगंटीवार यांच्या दीर्घकालीन प्रयत्नांना मूर्त स्वरूप मिळाले, ही भावना शब्दात मांडणे कठीण असल्याचे सांगत 2016 पासून सातत्याने प्रयत्न करून साकारलेले हे 280 कोटींचे कॅन्सर अर्पण होताना पाहण्याचा क्षण, माझ्या आयुष्यातील अत्यंत समाधानकारक, भावस्पर्शी आणि प्रेरणादायी ठरल्याचे ते म्हणाले…
कॅन्सर रुग्णांच्या सेवेसाठी ही 140 बेडेड भव्य-दिव्य रुग्णालयाची वास्तू जनतेच्या आरोग्यसेवेत दृढपणे उभी राहत आहे. चंद्रपूरच्या भूमीवर उभे राहिलेले पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर हॉस्पिटल हे केवळ उपचारांचे केंद्र नसून, रुग्णांना सुलभ, सन्मानपूर्वक आणि विश्वासार्ह उपचार मिळावेत या भावनेतून साकारलेले आशास्थान आहे.हा उपक्रम केवळ चंद्रपूरपुरता मर्यादित न राहता, संपूर्ण विदर्भातील हजारो कुटुंबांच्या आयुष्यात दिलासा, आत्मविश्वास आणि नवी उमेद निर्माण करणारा ठरेल, असा ठाम विश्वास आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.




