नायलॉन मांजा वापरून पतंग उडवताय…? तर सावधान..! होणार कठोर कारवाई…पोलिसांची ड्रोन द्वारे करडी नजर

0
50

 

कॉलेज कट्टा न्यूज
बल्लारपूर-मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने नायलॉन मांजाच्या वापराबाबत स्वत:हून SMPL No 1/2021 दाखल करुन दिनांक १२/०१/२०२६ रोजी आदेश पारित केले आहे. त्यात मा. उच्च न्यायालयाने अत्यंत कठोर पवित्रा घेतला आहे.
न्यायालयाचे आदेशानुसार, प्रतिबंधीत नायलॉन मांजाची विक्री, साठा किंवा वापर करणाऱ्यांवर आता मोठी दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

1) विक्रेत्यांसाठी दंड-नायलॉन मांजा विकतांना जर कुणी मिळुन आला तर संबंधितास 2 लाख 50 हजारांचा दंड जागीच तात्काळ आकारण्यात येईल.2) वापरकर्त्यांसाठी दंड : जर कुणी नायलॉन मांजाचा वापर करुन पतंग उडवितांना मिळून आल्यास त्याचेकडुन 25 हजार रु. दंड जागीच तात्काळ आकारण्यात येईल.3) जर अल्पवयीन मुले नायलॉन मांजाचा वापर करुन पंतग उडवितांना मिळून आल्यास त्याच्या पालकांकडुन 25 हजार रु. दंड जागीच तात्काळ आकारण्यात येईल.

जर कुणी दंड भरण्याबाबत टाळाटाळ करत असेल तर त्याच्याकडुन जमीन महसूल कायद्याप्रमाणे (महसुली थकबाकी, Land Revenue) पध्दतीने दंड वसुल केला जाईल.
प्रत्येक उल्लंघनासाठी स्वतंत्र दंड आकारण्यात येईल.
या बाबत न्यायाल्याने कठोर कायदा केला असून नियमांचे उल्लंघन केल्यास त्याचेवर कठोर फौजदारी कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या जाहीर सुचनेची माहिती नव्हती किंवा अज्ञान होते ही बाब दंड टाळण्यासाठी ग्राहय धरली जाणार नाही.

कोणीही नायलॉन मांजाचा वापर आणि खरेदी विक्री करु नये. सदर बाबत चंद्रपूर पोलीसांमार्फत विशेष Smart E-Beat पध्दतीने पोलीस पेट्रोलींग पथक नेमण्यात आले आहे व ड्रोन द्वारे सुध्दा निगरानी ठेवण्यात येणार असुन उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल.

पोलीस विभागा मार्फ नागरीकां साठी जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार जर कोणीही नायलॉन मांजा वापर करतांना किंवा विक्री करतांना आढळून आल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ चंद्रपूर पोलीस दलाचे WhatsApp No. 7887890100 आणि 112 यावर कळवावे. माहिती देणाऱ्यांचे नांव गोपनिय ठेवण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here