अनेक वर्ष आमदारकी भोगणाऱ्यावर मागच्या दारातून पालिकेचा स्वीकृत सदस्य होण्याची नामुष्की…

0
62

 

कॉलेज कट्टा न्यूज
पाथरी-नगरपालिकेवर तब्बल 35 वर्ष अधिराज्य गाजवलेल्या माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांच्यावर स्वीकृत सदस्य म्हणून नगरपालिकेत मागच्या दाराने जाण्याची नामुष्की ओढावली. पाथरी नगरपालिकेत स्वतः बाबाजानी 10 वर्ष, त्यांच्या पत्नी 5 वर्ष, तर पुतण्या आणि मुलगा प्रत्येकी अडीच वर्ष नगराध्यक्ष होते. इतकी वर्ष घरातच सत्ता राखल्यानंतरही बाबाजानी यांचा जीव नगरपालिकेत अडकला आणि त्यांनी स्वीकृत सदस्य होणे मान्य केले.पाथरी पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे अलोक चौधरी, तर स्वीकृत सदस्य म्हणून माजी आमदार बाबाजानी दुर्राणी आणि माजी नगराध्यक्ष मोईज अन्सारी यांची निवड झाली आहे. उपनगराध्यक्ष, स्वीकृत सदस्य निवडीसाठी नगराध्यक्ष आसेफ खान यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सर्वसाधारण सभानिकालात काँग्रेसचे 11, शिवसेनेचे 9 आणि राष्ट्रवादी 2 सदस्य विजयी झाले आहेत. यावेळी हात उंचावून मतदान घेण्यात आले. यात दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाली. यावेळी नगराध्यक्षांनी त्यांचे मत अलोक चौधरी यांच्या पारड्यात टाकल्याने ते एका मताने विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. स्वीकृत सदस्यपदासाठी काँग्रेसच्या (Congress) वतीने माजी आमदार बाबाजानी दुर्राणी व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष मोईज अन्सारी यांचा एक-एक अर्ज आल्याने नगराध्यक्ष आसेफ खान यांनी त्यांना विजयी घोषित केले. व काँग्रेस पक्षाकडून हतीम अन्सारी यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले.

निकालात काँग्रेसचे 11, शिवसेनेचे 9 आणि राष्ट्रवादी 2 सदस्य विजयी झाले आहेत. यावेळी हात उंचावून मतदान घेण्यात आले. यात दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाली. यावेळी नगराध्यक्षांनी त्यांचे मत अलोक चौधरी यांच्या पारड्यात टाकल्याने ते एका मताने विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. स्वीकृत सदस्यपदासाठी काँग्रेसच्या (Congress) वतीने माजी आमदार बाबाजानी दुर्राणी व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष मोईज अन्सारी यांचा एक-एक अर्ज आल्याने नगराध्यक्ष आसेफ खान यांनी त्यांना विजयी घोषित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here