काँग्रेस नेते विजय वड्डेट्टीवार यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत मागितली मतदारांची माफी..

0
91

 

कॉलेज कट्टा न्यूज:
चंद्रपूर-विजयाचे श्रेय घेतांना पराभवाची जबाबदारी स्वीकारणारे नेते क्वचितच बघायला मिळतात.खा.धानोरकर आणी वडेट्टीवरांचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर काँग्रेसच्या दिल्ली हायकमांड नी मध्यस्ती करत खा.प्रतिभा धानोरकर यांच्या गटातील महापौर बनवण्याची संधी देत ‘३४’ हा मॅजिक फिगर जुळवण्याची जबाबदारी दिली होती.पण संख्याबळाच्या आकड्यात ‘इगोत’ अडकलेल्या काँग्रेसचा एका मताने पराभव झाला.आणी काँग्रेसला बहुमत देणारा मतदार पुरता दुखावला गेला…ही गंभीर बाब लक्षात घेत
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीतील पराभवानंतर चंद्रपूरच्या मतदारांची माफी मागितली आहे.

रणनीती चुकल्याची कबुली: वडेट्टीवार यांनी मान्य केले की, काँग्रेसची उमेदवारांच्या निवडीबाबतची आणि निवडणुकीच्या दिवशीची रणनीती चुकली.

अपेक्षित पाठिंबा न मिळणे: काँग्रेसला शिवसेना (उबाठा) आणि वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंब्याची अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. शिवसेनेच्या (उबाठा) मदतीने भाजपने महापौरपद मिळवले.

अंतर्गत गटबाजी: निवडणुकीपूर्वी वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटांत तीव्र मतभेद आणि गटबाजी पाहायला मिळाली होती, ज्याचा फटका पक्षाला बसला.त्यामुळे काँग्रेसच्या गोटात दुफडी माजली.
भाजपचा विजय: बहुमतासाठी ३४ आकड्याची गरज असताना काँग्रेसकडे २७ जागा होत्या. मात्र, शिवसेनेच्या (उबाठा) मदतीने भाजपच्या संगीता खांडेकर यांचा एका मताने विजय झाला.”ज्या मतदारांनी आम्हाला मतदान केले, त्यांची मी माफी मागतो,” असे म्हणत वडेट्टीवारांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here