जागतिक महिला दिनी विश्वकर्मा नगरात वृक्षारोपण

0
75

 

कॉलेज कट्टा न्यूज
नागपूर-समर्थ नारी सामाजिक विकास संस्था, विश्वकर्मा नगर, वागदरा ईसासनी च्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देत, सामाजिक बांधिलकी आणि मनोरंजनाचा मेळ जोपासत कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या ब्रह्माकुमारी संगिता दिदी यांच्या हस्ते वृक्षारोपणाने झाली प्रसंगी “स्त्री ही निसर्गाप्रमाणेच सृजनशील आहे, तिचे संवर्धन करणे म्हणजे समाजाचे संवर्धन करणे होय” असे विचार यावेळी सुनीता दिदींनी व्यक्त केले, पर्यावरण रक्षणाचा संकल्प करत संस्थेच्या वतीने परिसरात विविध रोपांची लागवड करण्यात आली.
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा राणीताई भालेकर यांनी आपल्या भाषणातून महिलांना स्वावलंबी होण्याचे आवाहन केले, उपाध्यक्ष अश्विनीताई भिलकर आणि सचिव प्रमिलाताई वरठी यांनी संस्थेच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली, महिलांच्या प्रगतीसाठी अशा व्यासपीठाची गरज असल्याचे मत कोषाध्यक्ष कांचनताई कावळे व अश्विनीताई मांदाडे यांनी व्यक्त केले, खेळ आणि मनोरंजनाची धम्माल
केवळ भाषणेच नव्हे, तर स्थानिक महिलांसाठी विविध खेळ आणि मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते उत्साहाच्या वातावरणात परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला दैनंदिन धावपळीतून वेळ काढून महिलांनी संगीतमय खुर्ची, उखाणे आणि इतर विविध खेळांचा मनमुराद आनंद लुटला, कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी महिलांना व स्पर्धांमधील विजेत्यांना संस्थेतर्फे आकर्षक भेटवस्तू बक्षिसे देऊन गौरविण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक कावळे, हिमांशू वरठी, दीपक मस्के, विजय बोरकर यांनी विशेष परिश्रम घेतले आभार व्यक्त करत समारोह संपन्न झाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here