कॉलेज कट्टा न्यूज-
चंद्रपूर- विरोधी पक्षनेते आ.
वड्डेटीवार यांनी नितेश कराळे (मास्तर) यांच्या “फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी” वर कारवाई च्या संबंधाने सभागृहात जोरदार हल्लाबोल केला.
फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी” माध्यमातून दरवर्षी शेकडो विद्यार्थी घडतात, सरकारी नोकरीत सामील होतात. मात्र, मंत्र्यांच्या मुलीच्या विरोधात प्रचार केला म्हणून नितेश कराळे मास्तरांच्या या अकॅडमीची सरकारने चौकशी सुरू केली. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, पवित्र संविधानाने भारतातील प्रत्येकाला संविधानिक मार्गाने प्रचार करण्याचा अधिकार दिला आहे, असे असताना केवळ सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले.या संस्थेला सारथी, बार्टी या संस्थांच्या कामकाजातून हद्दपार करण्यात आल्याचेही त्यांनी सभागृहाला सांगितले.
कराळे मास्तरांची संस्था उत्तम आहे, या संस्थेच्या माध्यमातून सारथी व बार्टीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावे अशी अनेक विद्यार्थ्यांची मागणी आहे. या प्रकरणात सभागृहाने गांभीर्याने लक्ष द्यावे व उत्तम काम करणाऱ्या या संस्थेवर होणारा अन्याय थांबवावा अशी आग्रही मागणीही त्यांनी सभागृहात केली.




