संत सखू आईचा निस्सीम भक्त अकाश वसंतराव बावने…

0
144

 

सिंदी रेल्वे (सतीश भगत): संत सखू आईचा प्रगट दिन मोहत्सव वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे जवळील पळसगाव (बाई) या गांवात मोठ्या उत्साहात आणी भक्तिमय वातावरणात साजरा केल्या जातो.या तीर्थ क्षेत्राला महाराष्ट्र शासनाचा ‘ब’ दर्जा प्राप्त झाल्याने वर्धा जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील अनेक जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने येतात.त्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सिंदी रेल्वे येथील सखू आईचा निस्सीम भक्त आकाश वसंतररावं बावणे हे गेल्या चार वर्षापासुन सकाळी 9:00 वाजता पासून आपल्या सहकार्यांसोबत महाप्रसादाला सुरवात करतात.यात्रेला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांच्या आदरपूर्वक गाड्या थांबवून त्यांना विनम्रतेने महाप्रसाद ग्रहण करण्याची विनंती करतात.गेली 4 वर्षांपासून बावणे यांनी सुरु केलेला महाप्रसादाचा हा उपक्रम निरंतर सुरु असल्याने सिंदी रेल्वे आणी पळसगावात त्यांचे नाव आदरपूर्वक घेतले जाते.या उपक्रमा बद्दल महाप्रसाद ग्रहण केलेला प्रत्येक भाविक भक्त त्यांना आशीर्वाद आणी धन्यवाद देतो.त्यांच्या या भक्तिमय कार्यामुळे अनेक समाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत आहे,एवढे नक्की..!

ऐतिहासिक वारसाः पळसगाव (बाई) हे गाव संत सखूआईच्या वास्तव्याने पावन झालेले क्षेत्र असून, या देवस्थानला साधारणतः १५० वर्षांहून अधिक काळाचा इतिहास आहे.
राज्यस्तरीय दर्जाः या तीर्थक्षेत्राला महाराष्ट्र शासनाकडून ‘ब’ दर्जा प्राप्त झाला आहे, ज्यामुळे या यात्रेचे स्वरूप आता राज्यस्तरीय झाले आहे.
प्रमुख आकर्षणः संत सखुमाय यांच्या भक्तीची महिमा दूरवर पसरली असून, या यात्रेला विदर्भ आणि इतर भागांतून मोठ्या संख्येने भाविक येतात. “नारायण नारायण” हा त्यांच्या मुखातील अखंड नामजप आजही भाविकांसाठी प्रेरणादायी आहे.

संत सखुआई चे निस्सीम भक्त आकाश वसंतरावं बावणे यांना कॉलेज कट्टा टीम कडून हार्दिक शुभेच्छा तथा यात्रेत येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांचे कॉलेज कट्टा न्यूज कडून विनम्र स्वागत…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here