कॉलेज कट्टा न्यूज-बल्लारपूर शहरात जुन्या वैमानस्यातून 20 वर्षीय युवकावर तलवार आणी दंड्याने जीवघेणा हल्ला केल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून समीर कलीम खान (20) रा.दादाभाई नौरोजी वॉर्ड असे या तरुणाचे नाव असून त्याला गांभीर अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णाल्यात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या वृत्ता नुसार 26 डिसेंबर रोजी समीर खानचा वाढदिवस साजरा करताना जस्सी अदनकोंडावार याच्याशी किरकोळ कारणावरून त्याचा वाद झाला होता. त्यावेळी जस्सीने समीरला धमकी दिली होती.यामूळेच राग मनात धरूनच आरोपींनी हल्ला केल्याची माहिती आहे.
14 जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास समीर हा आपल्या मित्रांसह दादाभाई नौरोजी वॉर्डातील मातामंदिराजवळ बसलेला असताना जस्सी, वि-या, गिट्टू व ओम हे चौघे दोन मोपेडवर तेथे आले. कोणताही वाद न घालता त्यांनी समीरवर तलवार व दांड्याने सपासप मारहाण केली. समीरच्या डोक्यावर, मानेवर, दोन्ही हातांवर व पायांवर वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले, त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.
जखमी समीरला तातडीने ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींविरुद्ध भा. न्या.सं. कलम109 (1), 3(5) तसेच शस्त्र नियम कायदा कलम 4,25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी यशवंत उर्फ जस्सी अदनकोंडावार (25), रा. महाराणा प्रताप वॉर्ड बल्लारपूर व लक्ष्मण उर्फ गिट्टू मोगरे (18), रा. किल्ला वॉर्ड बल्लारपूर या दोघांना अटक करण्यात आली असून उर्वरित दोन आरोपी फरार आहेत.पुढील तपास पोलीस निरीक्षक विपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे…




