आरोप,प्रत्यालारोप,राडा, बंडखोरी आणी प्रशासनिक त्रुटीत मतदारांचा जनादेश अखेर मशीन बंद…

0
112

 

कॉलेज कट्टा न्यूज
चंद्रपूर :तब्ब्ल 8 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर चंद्रपूरकरानीं नगरसेवक पदासाठी मतदान केले.दरम्यान भाजप- काँग्रेस या प्रमुख पक्षातच मुख्य लढत होण्याची शक्यता वार्तवली जात असून दोन्ही पक्षातील बंडखोरीचा फटका नेमका कुणाला बसतो यावर राजकीय गणित अवलंबुन राहणार आहे.

राडा आणी आरोप प्रत्यारोप
14 जानेवारीच्या रात्री भाजप उमेदवार रॉबिन विश्वास आणि अपक्ष असलेले भाजप बंडखोर उमेदवार अजय सरकार यांच्या कार्यकर्त्यां मध्ये तुंबळ मारामारी ची घटना समोर आलीय.अजय सरकार यांनी रॉबिन विश्वास समर्थक असलेल्या अनु हाजरा या महिलेला मारहाण आणि विनयभंग केल्याचा आरोप केलाय. तर रॉबिन विश्वास यांनी अजय सरकार समर्थक असलेल्या ज्योती सरकार यांचा विनयभंग आणि मारहाण केल्याचा आरोप केलाय. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अजय सरकार आणि रॉबिन विश्वास या दोघांवरही विनयभंग, मारहाण करणे आणि शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केलाआहे. आज पहाटे दोन्ही पक्षांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अजय सरकार आणि रॉबिन विश्वास यांच्यात बंगाली कॅम्प प्रभागातून अस्तित्वाची लढाई आहे.मात्र या राड्यामुळे निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागले आहे.
दुसऱ्या प्रकरणात निवडणूक मतदाना दरम्यान शहरातील नेहरू शाळा मतदान केंद्राच्या परिसरात शिवसेना शिंदे गट आणि भाजप बंडखोर उमेदवारांच्या समर्थकांत मतदारांना प्रलोभन दिल्यावरून राडा झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आहे. यावेळी दोन्ही गटांने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत गोंधळ घातला होता. याठिकाणी शिवसेना शिंदे गटातर्फे इसमत हुसेन तर भाजप बंडखोर उमेदवार दीपा कासट मैदानात आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

कुठे मशीन बंद तर कुठे अँप बंद… मतदारांची नावे गहाळ-
मतदान प्रक्रियेत भाग घेण्यासाठी आपले कर्तव्य म्हणून मतदान करायल्या केंद्रावर आलेल्या अनेक मतदारांचे मतदार यादीत नाव नसल्याचे,नाव असून फोटो चुकीचा असल्याने त्यांना मतदान करता आले नाही,अशा तक्रारी मिळाल्या आहेत.तर कुठे मशीन मध्ये तांत्रिक बिघाड आल्याने मतदारांना बरीच वाट बघावी लागल्याची माहिती आहे.

आज उमेदवारांचे भाग्य नशीबबंद झाले असून,कोण बाजी मारेल यासाठी काही तास उमेदवार आणी मतदारांना वाट बघावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here