कॉलेज कट्टा न्यूज
बल्लारपूर- ज्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले त्याच शाळेत अथिती म्हणून जातांना तथा शाळेतील मुलांना जन्मदिनाचे औचित्य साधून शालेय परीक्षा साहित्य वाटप करतांना अत्यानंद झाला,अशी प्रतिक्रिया नगरसेवक सुमित डोहाणे यांनी व्यक्त केली.
यावेळी सरदार पटेल,फकरुद्दीन अली अहमद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आवर्जून उपस्थित होते.
जन्मदिनाच्या उपक्रमातील दुसऱ्या कार्यक्रमात दिनांक २३ जानेवारी रोजी दुपारी २ वा. रक्त तपासणी शिबीर आणी शिकलसेल तापासणी शिबिराचे आयोजन प्रभाग १० मधील शासकीय रुग्णालया मागील परिसरात करण्यात आले होते.या शिबिरातून शिकलसेल बाबत व्यापक जनजागृती करण्यात आली.नगर सेवक सुमित डोहाणे यांच्या जन्मदिनी राबविण्यात आलेल्या अनोख्या उपक्रमाचे शहरात कौतुक होत असून,या उपक्रमा दरम्यान राष्ट्रवादी युवा काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष इंजि.राकेश सोमाणी,नगर सेविका साजिया शाहीद शेख,नगर सेवक प्रणित सातपुते,
युवा नेते शाहीद शेख यांची मोलाची साथ मिळाली.तर जन्म दिनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी शीतल इंगळकर,शुभांगी लोखंडे,रुपाली डांगे,सपना बर्वे,भावना खोब्रागडे,आरती ढेंगर,फारूक शेख,संस्कार सुखदेव,शुभम लाभाणे,आरिफ खान,रिकी कैथवास,यश देवगडे,अर्पित भगत,रितेश अलोणे,लालू शेंडे,गौरव नाडमवार,परिष महाजनवर,हर्ष वाणे यांची मोलाची साथ मिळाली.




