माकडाने २० दिवसाच्या चिमुर्डीला विहरीत फेकले…डायपर ने केला चमत्कार..!

0
141

 

कॉलेज कट्टा ब्युरो-
छत्तीसगडच्या जांजगीर-चांपा जिल्ह्यातील सेउनी गावात एक अंगावर शहारे आणणारी घटना आणी तेवढीच धक्कादायक घटना घडली, जिथे एका माकडाने २० दिवसांच्या चिमुरडीला तिच्या आईच्या कुशीतून हिसकावून पळवून नेले.आणी विहिरीत फेकले…

कशी घडली घटना..?
या थरारक घटनेचे बाबत मिळालेल्या माहिती नुसार राठोड आडनावाची एक महिला आपल्या २० दिवसाच्या चिमुर्डीला घेऊन घराशेजारी बसली असतांना काही कळण्याच्या आत एका माकडाने अत्यंत जलद् गतीने तिच्या कुशीतून बाळाला हिसकावले.आणी बाळाला घेऊन पळू लागला.महिलेने आरडा ओरड करताच परिसरातील लोक जमा झाली.हा धक्का दायक प्रकार लक्षात येताच लोकांनी त्या माकडा पासून त्या बाळाला सुरक्षित रित्या मिळवण्याचा प्रयत्न केला.पण माकडाने इकडून तिकडे उडया मारत ते बाळ थेट विहिरीत फेकले…

डायपर ने केला चमत्कार!
बाळ विहिरीत पडले असताना तिने घातलेल्या डायपरमुळे ती पाण्यात बुडाली नाही. डायपरमधील हवेमुळे बाळ जवळजवळ १० मिनिटे पाण्यावर तरंगत राहिले, ज्यामुळे गावकऱ्यांना तिला वाचवण्यासाठी वेळ मिळाला.
गावकऱ्यांनी बादलीच्या मदतीने बाळाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने, गावात एका धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या राजेश्वरी राठोड नावाच्या परिचारिकेने बाळाला तातडीने CPR देऊन तिचे प्राण वाचवले.

सद्यस्थितीत बाळाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांच्या मते तिची प्रकृती आता स्थिर आहे.
बाळाचे वडील, अरविंद राठोड यांनी या संकटात मदतीला धावून आलेल्या गावकऱ्यांचे आणि परिचारिकेचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here