कॉलेज कट्टा न्यूज
नागपूर- दहावीच्या एका विद्यार्थिनीने अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २५ जानेवारी २०२६ रोजी समोर आली आहे.
या घटनेचे मुख्य तपशील
ही घटना नागपूर ग्रामीणमधील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दवलामेटी परिसरात घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार,आगामी बोर्डाच्या परीक्षेमुळे निर्माण झालेला अभ्यासाचा ताण आणि मानसिक दडपण यामुळे विद्यार्थिनीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.
विद्यार्थिनीने घरात कुणीही नसतांना आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले.दरम्यान तिचा भाऊ घरी आल्यावर ही घटना उघडकीस आली.या घटनेमुळे विद्यार्थ्यांवर शिक्षणाचा मानसिक दबाव किती खोलवर परिणाम करू शकतो हा मुद्दा पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.परीक्षेपूर्वी प्रत्येक शाळेतून विद्यार्थ्यांचे कॉन्सलिंग होऊन परीक्षेला समोरे जाण्यासाठी सक्षम करण्यात यावे,जेणेकरून विद्यार्थी परीक्षेच्या तोंडावर असे टोकाचे पाऊल उचलणार नाही;असे तज्ञांचे मत आहे.




