चंद्रपूरात शिवसेना (उबाठा)चा महापौर..?

0
120

 

कॉलेज कट्टा न्यूज
चंद्रपूर : चंद्रपुरातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे 6 नगरसेवक, वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक आणि 2 अपक्ष नगरसेवक असे एकूण 10 नगरसेवक मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. या 10 नगरसेवकांनी आधी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. त्यानंतर सर्व 10 नगरसेवक मुंबईच्या दिशेला रवाना झाल्याची माहिती आहे. हे सर्व नगरसेवक मुंबईत येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. या घडामोडींमुळे काँग्रेसची चिंता वाढणार आहे. कारण सर्व काही जुळून आलं तर चंद्रपूरमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधी बाकावर बसण्याची वेळ काँग्रेसवर येऊ शकते
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसला 27 जागांवर यश आलं होतं काँग्रेसला बहुमतासाठी केवळ 7 जागांची आवश्यकता होती. पण निवडणुकीच्या निकालापासून काँग्रेसमध्येच अंतर्गत कलह सुरु असलेला बघायला मिळाला. चंद्रपुरात भाजपला 24 जागांवर यश मिळालं आहे. तर ठाकरे गटाला 6 आणि इतर 9 उमेदवार निवडून आ आहेत. त्यामुळे ठाकरे गटाची भूमिका या निवडणुकीत गेमचेंजर ठरताना दिसत आहे. ठाकरे गटाने भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना महापौर पदाची अट ठेवली आहे. सत्ता स्थापन करायची असेल तर आपल्याला महापौर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here