चंद्रपूर मनपात शिव सेनेची मशाल पेटणार..?

0
74

 

कॉलेज कट्टा न्यूज
चंद्रपूर- काँग्रेसच्या अंतर्गत वादाच्या ठिणगीने चंद्रपूर महानगर पालिकेत भाजप च्या इंधनाने शिवसेना (उबाठा) ची मशाल पेटण्याची चिन्हे स्पष्ट होतांना दिसत आहे.

महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेचा पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय जनता पक्षाने चक्क शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सत्तास्थापनेसाठी साद घातली असून, दीड वर्षांच्या महापौरपदाचा नवा ‘फॉर्म्युला’ समोर ठेवल्याची विश्वासहार्य माहिती मिळत आहे.

काय आहे सत्तेचा नवा फॉर्म्युला? चद्रपूरमध्ये ६६ जागांपैकी काँग्रेसकडे २७, तर भाजपकडे २३ जागा आहेत. बहुमतासाठी ३४ आकड्यांची गरज असताना ६ नगरसेवक असलेली ठाकरेंची शिवसेना ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने ठाकरे गटाला दीड-दीड वर्षांच्या कार्यकाळाचा प्रस्ताव दिला आहे.५ वर्षांच्या कार्यकाळात पहिले दीड वर्ष ठाकरे गटाचा महापौर असेल, तर उर्वरित अडीच वर्ष भाजपचा महापौर राहील.महत्त्वाच्या स्थायी समितीचे सभापतीपदही वाटून घेण्याबाबत चर्चा सुरू आहे.

काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने हे ‘पाऊल’ उचलल्याचे बोलले जात आहे.दरम्यान ‘मातोश्री’वर हालचालींना वेग आला असून, ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी मुंबईत धाव घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. कोणत्याही परिस्थितीत पक्षाचा सन्मान राखला जाईल, तिथेच सत्ता स्थापन करा,असा निरोप उद्धव ठाकरेंनी स्थानिक नेत्यांना दिला आहे. मात्र,राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीत असलेल्या ठाकरे गटाने भाजपचा हा प्रस्ताव स्वीकारल्यास राजकीय वर्तुळात मोठे भूकंप होण्याची चिन्हे आहेत.

काँग्रेसच्या गोटात धाकधूक वाढली:
दुसरीकडे, सर्वात मोठा पक्ष असूनही काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याचा फायदा भाजप उचलण्याच्या प्रयत्नात आहे. काँग्रेसनेही ठाकरे गटाला अडीच वर्षांच्या महापौरपदाची ऑफर दिल्याची माहिती आहे.मात्र भाजप नेत्यांनी वेळेचे गंभीर्य ओळखत शिव सेनेला दिलेल्या प्रस्तावामुळे काँग्रेसच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

भाजप-शिवसेना (उबाठा) युतीचा ममहापौर म्हणजे जनमतांचा अवमान!
चंद्रपूरातील मतदारांनी भाजप ला दूर ठेवण्यासाठी काँग्रेसला बहुमत दिले.पण नेत्यांच्या आपसी ओढाताणीत आणी ‘इगो’ मुळे भाजपा- शिवसेनेच्या युतीत महापौर बनत असेल तर तो चंद्रपूरच्या मतदारांचा अवमान असल्याची प्रतिक्रिया उमठत आहे.आणी याचे खापर निश्चितपणे खा.प्रतिभा धानोरकर,काँग्रेस नेते आ.विजय वड्डेट्टीवार यांच्यातील आपसी संघर्षावर फुटेल,हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here