कॉलेज कट्टा ब्युरो-
नाशिक- प्रजासत्ताक दिनाच्या (२६ जानेवारी २०२६) शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.आपल्या भाषणात पालकमंत्री महाजन यांनी महापुरुषांची नावे घेतांना आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याने कर्तव्य बजावणाऱ्या वन विभागातील एका महिला कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री महाजनांना धारेवर धरले.
२६ जानेवारी हा दिवस भारतीय संविधानाचा गौरव असतांना पालक मंत्र्यांनी घटनकार डॉ. आंबेडकरांचे नाव आपल्या भाषणात का घेतले नाही?असा प्रश्न पालक मंत्र्यानाच विचारला.
यामुळे वाद निर्माण झाला होता
प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले नाही, असा आरोप करत वन विभागातील महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी भरकार्यक्रमात त्यांना थेट जाब विचारला.महिला पालकमंत्र्यांना प्रश्न विचारला की, “ज्यांनी संविधान दिले, त्या व्यक्तीचे नाव भाषणात का नाही?” हा गोंधळ वाढल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.आणी पालक मंत्र्यांया माफी मागायला सांगितलं मात्र त्यांनी
माफी मागण्यास नकार दिला
“मला सस्पेंड केले तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही; अशी स्पष्ट भूमिका घेत पालकमंत्र्यांनी त्यांची चूक मान्य केली पाहिजे,” अशी ठाम भूमिका माधवी जाधव यांनी मांडली.गिरीश महाजन यांनी या घटनेनंतर पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव अनावधानाने राहिले असावे, माझा असा कोणताही हेतू नव्हता. त्यांनी या प्रकरणाबद्दल दिलगिरी (माफी) व्यक्त केली आहे.




