कॉलेज कट्टा न्यूज
चंद्रपूर (नरेंद्र सोनारकर):या न त्या वादग्रस्त विधानामुळे राजकिय चर्चेत राहून स्वतःला उत्तम जगण्यासाठी मार्ग शोधणाऱ्या भिक्कार मानसिकतेच्या संभाजी भिडे आणी राज्याचे माजि राज्यपालं केश्योरी यांची बरीच चर्चा होत असतांना हे दोन्ही महाशय संविधान आणी कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहेत का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.अनेक वादग्रस्त विधाने करूनही या महाभागाना अभ्यदान देत असेल तर फिर्याद करायची कुणाला..?
शरद पवार यांच्यावर देशद्रीही असल्याची बोचरी टिका –
दरम्यान शरद पवार हे नास्तिक असल्याची त्यांची पार्षभूमी आहे.ते वार्,दिवस,तारिख ठरवून मास मटण खात नाहीत तर जेव्हा इच्छा होईल त्या पद्धतीने नियोजन करतात.नेमकी हिच बाब भिडेना खटकल्याचं वाटते.
त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. भिडे यांनी पवारांचा उल्लेख ‘देशद्रोही’, ‘लबाड’ आणि ‘जातीवंत’ असा केल्याने राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत.एका कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडे यांनी शरद पवार यांच्यावर तोफ डागली. भिडे उर्फ कुलकर्णी यांनी शरद पवार हे ‘देशद्रोही’ आणि ‘नंबर एकचे लबाड’ असल्याचे वक्तव्य केले आहे.पवारांनी समाजात जाती-पातीचे राजकारण पेरले आणि ते ‘जातीवंत’ नेते आहेत, अशी टीका करत महाराष्ट्राच्या आणि हिंदू धर्माच्या अधोगतीला केवळ आणि केवळ शरद पवार जबाबदार आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान अनेक अर्थाने देशद्रोहचा गुन्हा दाखल होऊ शकणाऱ्या भिडे उर्फ कुलकर्णीला आरोपी होण्यापासून वाचविण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा भाजप प्रणित महाराष्ट्र शासन देत असल्याने भिडे उर्फ कुलकर्णी यांची कायद्याला वाकुल्या दाखवत वाच्याळ गगन भरारी सुरु आहे.
का दिल्या गेल्याय भागतसिंग कोश्यारी ला पद्मभूषम.?
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेली काही प्रमुख वादग्रस्त विधाने केली होती.१) छत्रपती शिवाजी यांनी “जुन्या काळातील आदर्श” असे त्यांनी म्हटले होते. तसेच त्यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी यांचा उल्लेख “आधुनिक काळातील आदर्श” म्हणून केला होता.
२)”जर मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढले, तर मुंबईत पैसा उरणार नाही आणि ती देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही” असे विधान त्यांनी केले होते.त्यांनी या विधानाबद्दल जाहीर माफी मागितली तरी ३) सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बालविवाहाबद्दल टिप्पणी करताना त्यांनी उपरोधिकपणे म्हटले होते की, “१० वर्षांची मुलगी आणि १३ वर्षांचा मुलगा लग्नानंतर काय विचार करत असतील..?४)औरंगाबाद (संभाजी नगर) येथील एका कार्यक्रमात त्यांनी विधान केले होते की, “समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराजांना कोणी विचारले असते?” आणि रामदास हे महाराजांचे गुरू असल्याचे विधान त्यांनी केले.५) पंडित नेहरूंना शांततेचा दूत बनायची आवड होती, पण त्यामुळे देश कमकुवत झाला, अशी टीका त्यांनी केली होती
केंद्र सरकारने भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केल्यामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या वादग्रस्त विधानांची आठवण करून देत या निर्णयावर टीका केली आहे.
इतरांना राष्ट्रद्रोही ठरवणारे भिडे उर्फ कुलकर्णी यांना यांना कुणाचे राजाश्रय आहे..? पद्म भूषण मिळवणारा कोश्योरी एवढे वादग्रस्त विधाने करूनही सुरक्षित कसा..?असे अनेक प्रश्न उभे ठाकले असतांना,ज्या लगवगीत कोश्योरी यांना पद्म् भूषण दिले तसे संभाजी भिडे उर्फ कुलकर्णी यांना भारत रत्न देऊन त्यांनी आजवर राज्यपाल असतांना देशा अंतर्गत महापुरुषांचा केलेला अवमान,काळी टोपी घालून महाराष्ट्राच्या लोकशाहीची धिंड ही कामगिरी बघता त्यांना “भारत रत्न” देऊन गौरव करावा अशी व्यंगात्मक मागणी जागरूक नागरिकांकडून होत आहे….




