कॉलेज कट्टा-
बुलढाणा- आपल्या मुलीला डॉक्टर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून एका शेतकरी बापाने तिच्या शिक्षणाची तजवीज म्हणून ५ लाख रुपये बँकेत जमा केले होते.मात्र mbbs ची फी भरायची असल्याने.त्यांनी ते पैसे बँकेतून काढून आपल्या कार मध्ये ठेवले होते.मात्र पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी गाडीची काच फोडून त्या ५ लाख रुपयांसोबत बापाचे स्वप्न आणी मुलीचे भवितव्यही चोरून नेले…
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी नितीन परहाड यांनी आपल्या मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाची (BAMS) फी भरण्यासाठी ५ लाख रुपये बँकेतून काढले होते १६ सप्टेंबर २०२५ रोजी बुलढाणा येथे अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कारची काच फोडून ही रक्कम चोरली होती.स्थानिक गुन्हे शाखेने एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून एका शेतकऱ्याचे ५ लाख रुपये कर्नाटकातील शिवमोगा येथून यशस्वीपणे हस्तगत केले आहेत.
घटनेचे गंभीर्य ओळखून बुलढाणा पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे मुख्य आरोपी सुनील उर्फ बाळू रामू बोवी (३२) याला कर्नाटक राज्यातील शिवमोगा जिल्ह्यातील भद्रावती येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेली संपूर्ण ५ लाख रुपयांची रक्कम जप्त केली आणि ती संबंधित शेतकऱ्याला परत मिळवून दिली.यामुळे बापाचे स्वप्न आणी लेकीचे भवितव्य खाकी वर्दी ने परत मिळवून दिल्याची जोरदार चर्चा असून,या घटनेमुळे महाराष्ट्र पोलिसांचा आदर अधिक वाढला आहे…
ही कामगिरी बुलढाणा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुनील अंबुलकर आणि त्यांच्या पथकाने केली.
या कारवाईमुळे गरीब शेतकऱ्याच्या मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पुन्हा जिंवत झाले आह.या कामगिरीमुळे बुलढाणा पोलिसांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




