विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन….

0
133
  •  

    कॉलेज कट्टा न्यूज
    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार यांचे बुधवारी, २८ जानेवारी २०२६ रोजी एका भीषण विमान अपघातात निधन झाले आहे.

    आज सकाळी ८:४५ वाजताच्या सुमारास पुण्याच्या बारामती विमानतळावर लँडिंग करताना हे विमान कोसळले. मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या चार्टर्ड विमानाचे (Learjet 45) नियंत्रण सुटले आणि ते धावपट्टीजवळ कोसळून त्याला भीषण आग लागली

    या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व ६ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये दोन पायलट आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

    बारामतीमध्ये आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सार्वजनिक सभांना संबोधित करण्यासाठी ते जात होते.
    या धक्कादायक बातमीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here