इंजि.राकेश सोमाणी यांचा जन्मदिन विविध आरोग्य शिबिराच्या आयोजनाने साजरा…

0
54

 

कॉलेज कट्टा न्यूज
बल्लारपूर- राजकीय नेत्यांचा जन्म दिन म्हंटले की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो डीजे,महागडा केक,ओल्या,सुक्या पार्टीची रेलचेल…पण याला नेहमीच अपवाद असलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा चंद्रपुर चे जिल्हाध्यक्ष युवा नेतृत्व इंजी. राकेश सोमाणी यांच्या जन्मदिन विशिष्ट पद्धतीने आणी जनकल्याण लक्षात घेऊन साजरा करण्यात आला..जन्मदिना निमित्य बल्लारपूर शहरात आरोग्य शिबीर घेऊन आपल्या जन्मदिनाचे सार्थक करणाऱ्या राकेश सोमाणी यांना समाजातील राजकीय,समाजिक,संस्कृतिक,शैक्षणिक आणी पत्रकार क्षेत्रातून सशुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव झाला…

याचं जन्मदिनाचे औचित्य साधून इंजि राकेश सोमाणी यांच्या चाहत्यांनी गांधी वॉर्ड बल्लारपूर इथे समाज हित, समाज सेवा लक्ष्यात ठेऊन आरोग्य शिबिराच्या माध्यमातून हा जन्मदिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा साजरा केला.

या विशेष कार्यक्रमात् प्रमुख पाहुणे म्हणून इंजी. राकेश सोमाणी स्वतः हजर होते. नगर सेवक सुमित (गोलू)डोहने, नगर सेवक प्रणित सातपुते, विक्रांत पंडित, शाहिद शेख, आसिफ शेख तसेच मित्र परिवारतुन संस्कार सुखदेवे, शुभम लभाणे, रघुविर सोमाणी, दिनेश आसवाणी, नीरज तिवारी, चिंटू भोगले, नीरज शेंडे, रितेश अलोने, गौरव मेश्राम, यश देवगडे उपस्थित होते .
“आरोग्य हीच खरी संपत्ती ” हे ब्रीद लक्षात घेत मोफत रुग्ण तपासणी, नेत्र तपासणी, चष्मे वाटप, बी.पी.शुगर, बॉडी पेन तसेच मोफत औषधी वाटप करण्यात आले.

जन्मदिनाच्या आयोजित या कार्यक्रमांचे शहरभर कौतुक होत असून,प्रत्येक जागरूक व्यक्तींनी निष्कारण अव्याढव्य खर्च करण्या पेक्षा जनहितार्थ सेवाभावी पद्धतीने आपला जन्म दिन साजरा केल्यास समाजाला मोठा आधार मिळेल,अशी जनभावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

कॉलेज कट्टा टीम कडून इंजि.राकेश सोमाणी यांना जन्म दिनाच्या कोटी कोटी मंगल कामना..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here