चंद्रपूरात नाट्यमय रित्या भाजपचा महापौर…काँग्रेच्या ‘इगो’ ने जनमतांचा अवमान केला..!

0
108

 

कॉलेज कट्टा न्यूज
चंद्रपूर- अत्यंत नाट्यमय घडामोडी नंतर चंद्रपूरात अखेर भाजपच्या संगीता खांडेकर महापौर पदी विराजित झाल्यात.या महापौर निवडणुकीत भाजपचा झालेला चमत्कारीत विजय राज्यातील राजकारणात अनेक अर्थाने नवीन समीकरणे साकारणार असल्याची ही झलक असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

काँग्रेस जिंकूनही हरली…
महानगर पालिका निवडणुकीत काँग्रेसाला मिळालेले घवघवीत यश लक्षात घेता विजयाचे श्रेय लाटण्यासाठी आ.विजय वडेट्टीवार आणी खा.प्रतिभा धानोरकर यांच्यात तुंबळ गृहयुद्ध झाले. या ‘इगोच्या’ परिणामाची चिंता करण्यापेक्षा बहुमताच्या आकडेवारीवर झुलणाऱ्या दोन्ही नेत्यांना महापौर हा काँग्रेसचाच बसेल असा अंध विश्वास त्यांनी बाळगला होता.त्यामुळे महापालिकेची सूत्रे आपल्या हातात असावी यासाठी दोन्ही नेत्यांची सातत्यपूर्ण धरपळ अखेर दिल्लीपर्यंत पोहचली.महापौर निवडणुकीच्या अंतिम क्षणा पर्यंत काँग्रेसचाच महापौर होईल हा भ्रम त्यांनी बालगला होता.

वंचितची सांशक भूमिका-
जनहीत आणी विकासाच्या मुद्यावर उद्धव सेनेच्या युतीत जनतेनी वंचीत चे दोन नगर सेवक महापालिकेत पाठवले.पण एन महापौर निवडणुकीत हे दोन्ही नगर सेवक गैरहजर राहिले.मात्र यांच्या गैरहजेरीस कुठले कारण होते? यांचे उत्तर वंचित ला द्यावे लागणार आहे.दरम्यान एमआयएम ने आपले अस्तित्व आणी उपस्थितीची नोंद करत तटस्ट भूमिका घेतल्याने या पक्षाची विशेष चर्चा होतांना दिसत आहे.

संख्या बळाचा खेळच काँग्रेसला भोवला-
काँग्रेस २७,जनविकास ३,बसपा १ अशी ३१ पर्यंत मजल मारलेल्या काँग्रेला वंचित आणी अपक्षांची साथ मिळेल असा अखेर पर्यंत विश्वास् होता.मात्र नेमका हाच धोका ओळखून शिवसेना (उबाठा) आणी भाजपने वंचीत चा ‘गेम’ केला.आणी शेवटच्या क्षणात काँग्रेसला ३१ तर भाजपला ३२ मते मिळून भाजपचा महापौर चंद्रपूर महापालिकेत विराजित झाला.

उपमहापौर पदावरही फिरले पाणी-
शिवसेना (उबाठा) चे प्रशांत दानव यांचा उपमहापौरपदी रोमांचक विजय झाला आहे.मित्रपक्ष आणी काँग्रेसचे पप्पू देशमुख आणि प्रशांत दानव यांना समसमान (३२-३२) मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठीने दानव यांचा विजय निश्चित झाला

काय आहे राजकीय करार?
स्थानिक नेत्यांमधील करारानुसार, पहिल्या १५ महिन्यांसाठी महापौरपद भाजपकडे असेल आणि त्यानंतर ते उद्धव सेना गटाला दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here