कॉलेज कट्टा न्यूज-
चंद्रपूर-महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर संगीता खांडेकर यांच्या पदग्रहण सोहळ्यात भाजप आमदार किशोर जोरगेवार यांना निमंत्रण न दिल्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.दरम्यान आ.सुधीर मुनगंटीवार आणी आ.किशीर जोरगेवार यांच्या समर्थकात सभगृहातच शाब्दिक चकमक झाल्याने ही तीव्रता कुठल्या शिगेला पोहचेल हे काही सांगता येत नाही.
जोरगेवार समर्थकांनी व्यक्त केला संताप;
निवडणूक प्रमुख आणि स्थानिक आमदार असूनही जोरगेवार यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. निमंत्रण नसल्याचे समजताच जोरगेवार समर्थकांनी (नगरसेवक) संताप व्यक्त केला आणि कार्यक्रमातून आणी सभागृहातून बाहेर पडण्याचा (बहिष्कार) निर्णय घेतला.
यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार समर्थक आणि जोरगेवार समर्थकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली, ज्यामुळे महापालिकेत तणाव निर्माण झाला होता.
पार्श्वभूमी: १० फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर यांनी शिवसेना (UBT) च्या मदतीने काँग्रेसचा एका मताने पराभव करून महापौरपद मिळवले. मात्र, सत्तास्थापनेच्या पहिल्याच दिवशी मुनगंटीवार आणि जोरगेवार गटातील हा वाद उफाळून आला आहे.या प्रकारामुळे चंद्रपूर भाजपमधील सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला असल्याचे दिसून येत आहे.भाजपच्या विजया नंतर आ. सुधीर मुनगंटीवार समर्थकांनी “बाप तो बाप रहेगा” या आशयाची चंद्रपूरात पोस्टरबाजी केल्याने जोरगेवार समर्थक चांगलेच डिवचल्या गेले आहेत.




