9 वी च्या विद्यार्थिनीला व्हॅलेंटाईन डे रोजी शिक्षकाने केले प्रपोज…गुन्हा दाखल..!

0
93

 

कॉलेज कट्टा न्यूज
सातारा-जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मलकापूरमध्ये १४ फेब्रुवारी २०२६ (व्हॅलेंटाईन डे) रोजी ही संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका शाळेतील शिक्षकाने “गुरु शिष्याच्या” पवित्र नात्याला काळिमा फासत हा निंदनीय प्रकार केल्याने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.इयत्ता नववीत शिकणाऱ्या. एका १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रपोज करून तिचा विनयभंग केला आहे.

काय आहे घटना?
१४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बोलावले. भीतीपोटी मुलगी तिच्या तीन मैत्रिणींना सोबत घेऊन बाहेर गेली होती, मात्र शिक्षकाने इतर तिघींना वर्गात पाठवून पीडित मुलीला एकटे थांबवून घेतले.शिक्षकाने मुलीचा हात धरला आणि “मी तुझ्यावर प्रेम करतो, तू रात्री ३ वाजता व्हॉट्सॲपवर ऑनलाइन का असतेस?” असे विचारत तिला प्रपोज केले.या प्रकारानंतर पीडित मुलीने आपल्या कुटुंबीयांना सर्व माहिती दिली. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांच्या फिर्यादीवरून कराड शहर पोलिस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कराड येथील या घटनेत संशयित शिक्षक राजेंद्र कसबे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असला तरी, त्याच्या निलंबनाबाबत (Suspension) किंवा हकालपट्टीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा किंवा आदेश जारी झालेला नाही पोलिसांनी सध्या केवळ गुन्हा दाखल केला असून, पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पुरावे गोळा केले जात आहेत.

शाळा व्यवस्थापनाची भूमिका-
सहसा अशा प्रकरणांमध्ये पोलिसांकडून अधिकृत अहवाल प्राप्त झाल्यानंतर किंवा अटक झाल्यानंतर शाळा प्रशासन किंवा शिक्षण विभाग निलंबनाची कारवाई करते.पण वृत्त लिहिस्तोवर शाळा व्यवस्थापनाने या घटनेनंतर कोणतीही कठोर प्रशासकीय कारवाई केल्याची माहिती नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here