कॉलेज कट्टा न्यूज
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगर पालिकेतील कंत्राटी अभियंत्याला 1 लाख 30 हजाराची लाज स्वीकारतांना रंगेहात अटक करण्यात आल्याने जिल्यात एकच खळबळ उडाली आहे.या लाचखोर कंत्राटी अभियंत्याचं नाव शुभम वरघाट असे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहिती नुसार चंद्रपूर येथील महानगर पालिकेच्या कंत्राटी अभियंता लाच स्वीकारल्या शिवाय काम करत नव्हता.या मुळे कंटाळलेल्या फिर्यांदीने लाच लुचप्त प्रतिबंधक विभागाला तक्रार केली.त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून अलगद त्याला अटक केली आहे.
चंद्रपूर महानगरपालिका पालिकातील रमाई शहरी आवास योजनेच्या कंत्राटी अभियंत्याला १ लाख ३० हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. कंत्राटदाराकडून काम मंजूर करून, फाईल पुढे सरकवण्यासाठी,१ लाख ३० हजार रुपयांची लाच मागितल्याची संबंधित कंत्राटदाराने चंद्रपूरच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे या अभियंत्याची तक्रार केली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने साफळा रचून अभियंत्याला अटक केली. आता या प्रकरणाची पुढील चौकशी केली जातेय.




