कॉलेज कट्टा न्यूज
नांदेड- २८ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ दरम्यान २० वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत या संमेलनाचे अध्यक्ष असून यशवंत महाविद्यालयाच्या परिसरात हे संमेलन पार पडत आहे. ‘पुन्हा चाल करु या’ ही विद्रोहाची हाक देत हे संमेलन साहित्यिकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.
संमेलनाची महत्त्वाची वैशिष्ट्ये:
अध्यक्ष: ज्येष्ठ कवी व अनुवादक लोकनाथ यशवंत (नागपूर).
उद्घाटक: डॉ. बजरंग बिहारी तिवारी.जीवनगौरव पुरस्कार: बार्शीचे कामगार नेते कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांना विद्रोही ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
यशवंत महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित या दोन दिवसीय संमेलंनाची सुरवात
२७ फेब्रुवारी रोजी साहित्यदिंडी ने झाली असून हे संमेलन १ मार्च २०२६ पर्यंत असणार आहे.
प्रस्थापित मूल्यव्यवस्थेविरुद्ध शोषणमुक्तीचा विचार आणि संघर्षशील कविता. विविध परिसंवाद,निमंत्रितांचे कविसंमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कुसुमताई चव्हाण यांच्या स्मरणार्थ ‘कुसुम महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे.दरम्यान विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या कवितांचे वाचन करण्यात येणार असून,अनेक विद्रोही लेखकांच्या प्रगट मुलाखतीही घेतल्या जाणार आहे.त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ‘ते पन्नास दिवस’ या कादंबरी चे लेखक पवन भगत यांचाही समावेश आहे.तथा विद्रोही कविसमेलनात कविता सादरीकरणासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून नरेंद्र सोनारकर,सिमा भसारकर,संगीता बांबोडे यांची निवड करण्यात आली आहे.
हे संमेलन विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आयोजित केले जात असून,या भरगच्च संमेलनात मानवतावादी मूल्यांची वैचारिक मेजवानी मिळणार आहे.




