बंडू धोत्रे यांचे अन्न त्याग आंदोलन बळजबरीने चिरडण्याचा प्रयत्न…जाहीर निषेध…

0
167

 

कॉलेज कट्टा न्यूज-
चंद्रपूर-पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉरमधील नियोजित लोहारडोंगरी लोहखनिज खाण प्रकल्पा विरोधात सुरु केलेले अन्न त्याग आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी बळजबरीने रात्री 12 च्या दरम्यान त्यांना रुग्णवाहिकेत बसण्यास भाग पाडले.दरम्यान पोलिसांची अशोभनीय वागणूक,अरेरावीचा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तीव्र शब्दात जाहीर निषेध करीत आहे.

कशासाठी सुरु करण्यात आले अन्न त्याग आंदोलन?-
चंद्रपूर हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर असून, जगातील तापमानवाढीतील सर्वात उष्ण परिसर आहे.सामान्यांचे जगणे प्रचंड मुश्कील असतांना ताडोबा व्याघ्र कॅरिडोअरमधील घनदाट जंगलातील लोहारडोंगरी येथे लोहखाणीला बेकायदेशीर परवानगी देण्यात आली. मानव-वन्यजीव संघर्षात मागील ५ वर्षात एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात २०० हून अधिक बळी गेले आहे. ताडोबा, लोहारडोंगरी, चंद्रपूर वाचवण्यासाठी पर्यावरणवादी कार्यकर्ते मा.बंडू धोत्रे यांचे ५ मार्च पासून संविधानिक मार्गाने अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू होते.

वाघांच्या कॉरिडॉरला धोका, वाढता वन्यजीव-मानव संघर्ष आणि पर्यावरणीय हानी थांबवण्यासाठी खाणीची परवानगी रद्द करण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या अत्यंत संवेदनशील कॉरिडॉरमध्ये लोहारडोंगरी लोहखाणीला दिलेली वन्यजीव मंजुरी ही पर्यावरण विनाशक असून लोहारडोंगरी खाण प्रकल्प कायमचा रद्द करावा,मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी २०२१ च्या समितीच्या शिफारशी लागू कराव्यात या प्रमुख मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरु होते.या आंदोलनाला अनेक पर्यावरणवादी आणि वन्यजीव प्रेमींनी पाठिंबा दर्शविला आहे.दरम्यान रात्री 12 च्या सुमारास पोलिसांनी बंडू धोत्रे यांना बळजबरीने उचलून रुग्णवाहिकेत बसववून या आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाने जाहीर निषेध केला असून,या आंदोलनाला पुरोगामी पत्रकार संघानेही जाहीर पाठिंबा दिला आहे.

ही तर मुस्कट दाबी –
पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांनी पोलिसांनी बळजबरी करत हे सत्याग्रह आंदोलन चिरडण्याचा जो भ्याड प्रयत्न केला आहे,त्याचा तीव्र निषेध केला असून,भारतीय संविधाने दिलेल्या अधिकारा नुसार कायदेशीर मार्गाने सुरु असलेले आंदोलन बळजबरीने चिरडण्याचा प्रयत्न होत असेल तर हा संवैधानीक अधिकारांचा अवमान आहे.आणी ही मुस्कट दाबी कदापी योग्य नाही.आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो,असे सोनारकर यांनी म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here