कॉलेज कट्टा न्यूज-
चंद्रपूर-दिशा महाराष्ट्रची आयोजित जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील 50 नामवंत महिलांचा राज्यस्तरीय माता सावित्रीबाई फुले सन्मान सोहळा तसेच राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ सन्मान सोहळा नवी मुंबई सानपाडा येथे 15 मार्च 2026 ला आयोजित केलेले आहे.कवयित्री संगीता बोरकर- बांबोळे, गोंडपिपरी यांनी साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्वल त्यांची या पुरस्कारासाठी निवड केल्या गेली आहे.त्यांनी अनेक विषयांवर लेख,चारोळी,कविता,कथा सुविचार, बऱ्याच कवितासंग्रहाचे समिक्षण तसेच काव्यलेखन स्पर्धा, नवनवीन विषयावर काव्य उपक्रम घेऊन त्याचे परिक्षण सुध्दा केलेले आहे.त्याच बरोबर त्यांचा सामाजिक क्षेत्रात सुध्दा उल्लेखनीय असा सहभाग आहे.त्याच्या या सर्व कार्याचा आढावा घेऊन त्यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ साहित्यरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.




