पत्रकार राहुल गायकवाड यांचे आंदोलन गुंडाळल्याने शहरात अनेक तर्क वितर्क….

0
102

 

कॉलेज कट्टा न्यूज-
बल्लारपूर-अनेक जनहिताच्या मागण्या घेऊन अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या पत्रकार राहुल गायकवाड यांचे आंदोलन 24 तासाच्या आत अचानक गुंडाळण्यात आल्याने शहरात अनेक तर्क वितर्क लढावल्या जात आहे.शहरातील अतिक्रमण हटवण्याशिवाय दुसरी कोणतीच मागणी पूर्ण होण्यापूर्वी हे आंदोलन गुंडाळल्या गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

प्रशासनाने अन्न त्याग आंदोलनाची परवानगी दिली कशी?
पत्रकार राहुल गायकवाड हे शरीरिक दृष्ट्र्या आजारी असतांना अनेक समाजिक मागण्यासाठी त्यांनी प्रशासनाला अन्नत्याग आंदोलनाची परवानगी मागितली.मात्र स्थानिक प्रशासनाने त्यांच्या शारीरिक व्याधी बाबत कोणतीही चौकशी न करता त्यांना अन्नत्याग आंदोलनाची परवानगी देणे म्हणजे त्यांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार प्रशासनाकडून होऊन त्यांनी या आंदोलनाला परवानगी दिली कशी? असा यक्ष प्रश्न या निमित्ताने उभा ठाकला आहे.

काय होत्या प्रमुख मागण्या..?
1. शहरातील वाढत्या अतिक्रमणावर तात्काळ कारवाई करून ते हटवण्यात यावे.
2. शहरातील 31 बट्टे जमीन या ठिकाणी बिल्डरने केलेल्या अतिक्रमणामुळे महाराष्ट्र शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला असून या प्रकरणाची सीआयडी मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.
3. विसापूर जवळील 69 बट्टे जमीन, जी विनोबा भावे यांच्या आंदोलनातून भूमिहीनांना देण्यात आली होती, ती बिल्डरांनी कोट्यवधी रुपयांना विक्री करून शासनाचा मोठा महसूल बुडवला आहे. या प्रकरणाचीही सीआयडी चौकशी करण्यात यावी.
4. पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार वाढत असून, संपूर्ण चौकशी होईपर्यंत पत्रकारांवर गुन्हे दाखल करू नयेत.
5. पत्रकार रमेश निषाद यांना जीवे मारण्याची धमकी देऊन अश्लील शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात लावलेली आयपीसी कलमे रद्द करून पत्रकार सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात यावी.
6. सुरजागड येथून मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी.
शासकीय जमिनीवरील अतिक्रमनाचे काय?
मागणी क्रमांक 2 आणी 3 या आंदोलनातील विशेष मागणी असतांना त्यावर कुठलाही तोडगा निघाल्या शिवाय किंवा शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या भूमाफिया विरुद्ध कुठल्याही कार्यवाहीचे आश्वासन मिळण्या पूर्वीच हे आंदोलन का गुंडाळण्यात आले?हा महत्वाचा प्रश्न एरणीवर आला असतानांच फक्त रोडवरील अतिक्रमन हटविण्याच्या आश्वासना नंतर लगेच हे आंदोलन का गुंडाळण्यात आले?असे गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

गायकवाड यांची प्रकृती अस्थिर झाल्यानंतर आंदोलन पुढे नेण्याची जबाबदारी समर्थकांनी का स्वीकारली नाही..?
मुद्दा क्रमांक 5 नुसार पत्रकार रमेश निषाद यांना जीवे मारण्याची धमकी देऊन अश्लील शिवीगाळ करणाऱ्या आरोपीवर पत्रकार सुरक्षा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला का?सुरजगड येथून मोठ्या प्रमाणात चालणारी वाहतूक बंद करण्यात येईल,असे लेखी आश्वासन मिळाले का…? असे अनेक प्रश्न आवासून उभे असतांना गायकवाड यांच्या अन्न त्याग आंदोलनाला पाठींबा देणारे हे आंदोलन गुंडाळल्या जात असतांना काय करत होते..? त्यांनी हे आंदोलन पुढे का चालवले नाही? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सध्यातरी उपलब्ध नाही.त्या मुळे हे आंदोलन फक्त पूथपाथ वरील मेहनतीने धंदा करून आपल्या कुटुंबंयांचे पोट जगवणाऱ्या गरीब बेरोजगारा विरुद्धच होते का?असा प्रश्न अनावधानाने उपस्थित झाला आहे.

भूमाफियांच्या सिआयडी चौकशीचे चौकशीचे काय?
मागणी क्रमांक 2 व 3 या आंदोलनाच्या महत्वपूर्ण मागण्या होत्या.मात्र यावर कोणत्याच लेखी आश्वासना शिवाय आंदोलन मागे घेण्याचा हेतू काय? सन्माननीय ठाणेदार इंगळे हे या प्रकरणी सिआयडी मार्फत चौकशी करण्याचे आश्वासन देऊ शकतात काय? हे शक्य नसतांनाही आंदोलन गुंडाळण्याची घाई का? यासारख्या अनेक प्रश्नांनी या आंदोलनाला गालबोट लावले असून हे आंदोलन एका पत्रकाराने सुरु केल्याने सर्वच मागण्यांची लेखी पूर्तता झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत हे आंदोलन गुंडाळण्याचे किंवा मागे घेण्याचे कुठलेही कारण नसल्याने शहरात या अन्न त्याग आंदोलना विषयी अनेक तर्क वितर्क लावल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here