भोंदू अशोक खरात याला क्लीन चिट मिळाल्यावर लोकसभा किंवा राज्य सभा मिळणार…

0
70

 

ठरल्यानुसार स्क्रिप्ट तयार होती आणि नाटक नेटाने सुरू झाले… पोलिसांनी खूप मारल्याचे सोंग आणणे म्हणजे जनतेचा राग थोडा शांत होईल , आणि मग आता लिंगपिसाट बाबा आजारी पडतील…. कदाचित अचानक हृदयविकार झटका वगैरे मग नाशिक येथील शासकीय दवाखान्यात भरती.. …. !!! पुढे वातावरण जसं तापवले गेले त्याच प्रकारे थंड केले जाईल. काही नवीन विषय समोर येईल आणि हा अध्याय समाप्त केला जाईल….

आपण सोसियल मिडिया वापरणारे यांनी मात्र शेवटचा व्हिडिओ बाहेर येत नाही तो पर्यंत आवाज उठवीत राहायचं..

या देशात लिंगपिसाट आसाराम असो की रामराहीम बाबा… यांचं काहीही वाकडे झाले नाही. सर्वात कहर म्हणजे यांना इतके सगळे उघड होऊन देखील तरीही भक्त मंडळ मिळतात..

खरात वाटाघाटीत फसला , त्याला सौदा करता आला नाही आणि प्रकरण बाहेर आणलं गेले.. कोणी आणलं , कस व का आणले या विषयी अधिक लिहिता येणार नाही ..!! आजही गावा गावात असे हजारो खरात राज्यात आहेत जे मंत्र तंत्र , काळी जादू , भविष्य , तोडगे ताडगे नावाने त्यांच्या भक्तांना गंडवितात….. यांना राजाश्रय प्राप्त असतो कारण यांच्या जवळ गर्दी असते , राजसत्तेला धर्म सत्तेची उब पाहिजे असते आणि धर्मसत्तेला राजाश्रय पाहिजेच असतो…

खरात बेफाम झालेला होता , अय्याश विकृत बनला …… असे भोंदूगिरी करणारे सर्वच जाती धर्मांत सापडतील. यांच्यावर कायद्याचा धाक चालत नसतो कारण यांना हात जरी लागला तरी सगळी जात/धर्म यांच्या बचावासाठी उभी केली जाते…

खरात प्रकरण दाबून टाकावच लागणार आहे याला दुसरा पर्यायच नसणार कारण यात इतका प्रचंड गुंता असावा की सरकारला हादरे बसू शकतील. निदान लिपस्टिक वाल्या मॅडमची देहबोली उर्फ आत्मविश्वास हेच दर्शवित आहे…..

एरवी हे प्रकरण सहज दाबल्या गेले असते मात्र सोशल मिडीयाची इतकी जबरदस्त ताकद आहे की तासात संपूर्ण देशात हे प्रकरण उघड पडले गेले..

बाकी खरातकांड मधील पुढील व्हिडिओ क्लिप्स दाबून टाकल्या जाण्याच्या शक्यते मूळ अत्यंत आतुरतेने पुढील भागांच्या किल्पची वाट बघणाऱ्यांचा भ्रमनिरास होण्याची मोठी शक्यता आहे ..!!

प्रकरण खरात कांडचे आणि नेहमी प्रमाणे इथे बचाव करायला भक्तुल्ले हळूहळू पुढे येऊ लागलेत …कारण यांच्या नजरी “धर्म खत्रेमें ” !!!

कोणी काहीही म्हणो… खरात ने गेली दोन दिवस झाली मार्केट मारलय.. लोकसभा नाही तर किमान राज्यसभेसाठी फिट केस आहे.. क्लीन चिट मिळाली कि आहेच “पार्टी विथ डिफरन्स” मधे शाही पक्ष प्रवेश … !!!

-अशोक मुरलीधर गुंडेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here