कॉलेज कट्टा टीम-
बल्लारपूर- जिल्यात दुसऱ्या क्रमांकाचं शहर म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या बल्लारपूर शहराला 5 सप्टेंबर 2022 रोजी मुख्यधिकारी आणी प्रशासकाच्या रूपात विशाल वाघ नावाचे अधिकारी लाभले.गेली चार वर्षात प्रशासक आणी मुख्यधिकारी म्हणून बल्लारपूर नगर पालिकेची धुरा सांभाळतांना शहरातील शेवटच्या माणसांपर्यंत विकासकामे पोहचावी हाच हेतू घेऊन त्यांचा यशस्वी प्रवास सुरु आहे.
विन्रमता,शालिनता,सहकारिता,कर्तव्यदक्षता आणी संवेदनशीलता या गुणांनी त्यांना विशेष आणी लोकप्रिय बनवले आहे…सर्वसामान्यांच्या तक्रारी हाताळतांना किंवा एखाद्या समस्येचे निराकरण करतांना कुणावरही अन्याय होणार नाही,याची दक्षता त्यांनी नेहमीच बाळगली आहे.पालिकेच्या विविध योजना हाताडतांना किंवा विकास कामांच्या शासकीय योजना प्रत्येक नागरिकां पर्यत पोहचवण्याचा त्यांचा आजवरचा यशस्वी पर्यत राहिला आहे.
बल्लारपूराचे नाव देशभर पोहचवणारे मुख्याधिकारी विपीन मुद्दा यांचा मोठा कार्यकाळ शहराला लाभला होता.त्यांचा बदली नंतर विजय सरनाईक,
विजय देवळीकर यांनीही काहीकाळ कार्यभार सांभाळला.दरम्यान गडचिरोलीहुन बदली झाल्यानंतर विशाल वाघ यांनी मुख्यधिकारी म्हणून 5 सप्टेंबर 2022 रोजी बल्लारपूरचा पदभार स्वीकारला…टीम वर्क,पालिकेतील सर्व सहकारी अधिकारी आणी कर्मचाऱ्याशी सौजन्य साधून कोणते काम कसे हाताळायचे,समूहिक नेतृत्वातून समस्येवर कसा उपाय शोधायचा,सर्वसामान्य जनतेच्या कामात दिरंगाई होऊ नये म्हणून काय काय उपाययोजना करायच्या;याची रीतसर घडी घालून त्यांनी आजवर यशस्वी कार्यभार वाहिला आहे.
आज पालिका अधिकारी,कर्मचाऱ्यांचेच नव्हे तर बल्लारपूरकरांच्या लाडके मुख्यधिकारी मा.विशाल वाघ यांचा जन्मदिन…एक अधिकारी,प्रशासक आणी मुख्यधिकारी म्हणून कर्तव्य दक्षतेने त्यांनी शहराला दिलेली सेवा पुढेही निरंतर सुरु राहो,त्यांना निरोगी आरोग्य मिळो,बल्लारपूर शहराच्या उत्थानासाठी त्यांच्या हातून विविध उपक्रम घडोत हिच कॉलेज कट्टा टीम कडून सदिच्छा…त्यांना जन्म दिना बद्दल कोटी कोटी शुभेच्छा..! पुढील वाटचालीस अनंत मंगल कामना….




