सत्तेच्या मलिद्यासाठी भाजपच्या मांडीवर बसणाऱ्या त्या 12 काँगेसी नगर सेवकांना बसावे लागणार घरी..?

0
79

 

कॉलेज कट्टा न्यूज:
ठाणे- जिल्ह्यातील अंबरनाथ
नगरपरिषदेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवत भाजपने मोठा गेम करत शिंदे गटाला बाजूला ठेवत भाजप ने सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसशी अभद्र युती केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती…

भाजपचे 16, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 अशा एकूण 32 नगरसेवकांना सोबत घेऊन हिंदुत्व आणी काँग्रेसमुक्त भारत चा नारा देणाऱ्या भाजप ने काँग्रेसला सोबत घेऊन अंबरनाथ नगरपरिषदेत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अंबरनाथ नगरपालिकेतील 12 नगरसेवकांना थेट घरचा रस्ता दाखवला आहे.

“अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत आपण काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. मात्र, आपण प्रदेश कार्यालयास कोणतीच माहिती न देता भाजपसोबत हातमिळवणी करीत युती केली आहे. ही बाब चुकीची असून पक्षशिस्तीचा भंग करणारी आहे” अशा आशयाचे पत्रच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काढल्याने या आदेशावरून 12 नगरसेवकांना पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. त्यासोबतच आपली ब्लॉक काँग्रेस कमिटी बरखास्त करण्यात येत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आल्याने काँग्रेसच्या तिकिटांवर निवडून येऊन सत्तेचा मलिदा खाण्यासाठी भाजपच्या मांडीवर बसणाऱ्या विजयी 12 नगर सेवकांवर घरी बसण्याची पाळी येणार असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here