सब्जी मंडी परिसरात गाईचा आतंक… कोणाचा जाईल बळी..?

0
120
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
  • कॉलेज कट्टा
  • बल्लारपूर प्रतिनिधी- जुन्या सब्जी मंडी कल्पना लॉज रोड परिसरात एका मोकाट गायीने अक्षरशः उच्छाद माजवला असून या परिसरातून दुचाकीने ये-जा करणाऱ्या नागरिकांवर अचानक हल्ला करून ही गाय त्यांचा पिच्छा पुरवते.जीव वाचवण्याच्या धावपडीत एखादा मोठा अपघात किंवा या गायीच्या हल्ल्यात एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता वार्तविली जात आहे.
  • आज दिनांक ६ डिसेंबर रोजी सकाळी ६ चे दरम्यान आमचे प्रतिनिधी आपल्या दुचाकीने (एक्टीवा क्र,एम.एच. ३४ बी.एस.६८२५) ने आपल्या घराकडे जात असतांना कल्पना लॉज कडून विरुद्ध दिशेने एक पांढऱ्या रंगाची मोठे सिंग असलेली गाय चवताडून गाडीवर हल्ला करण्यासाठी धावली.ही बाब लक्षात येताच सदर प्रतिनिधीने मुंदडा यांच्या दुकाना शेजारी असलेल्या इलेक्ट्रीक खांबा जवळ गाडी थांबवली.काही कळायच्या आतच या गाईने गाडीवर हल्ला करून गाडी पाडली.मग तीने आपला मोर्चा खांबा मागे उभ्या असलेल्या प्रतिनिधी कडे वळवला.प्रतिनिधीने आपला जीव वाचवण्यासाठी धूम ठोकली.मात्र तेवढ्याच गतीने या गायीने त्यांचा पिच्छा केला…सुदैवाने एका युवकाने हिमतीने समोर येत काठीने या गायीचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला.याच क्षणाचा फायदा घेत प्रतिनिधीने आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.पण ही चौताडलेली गाय पिच्छा सोडायला तयार नव्हती.हा अंगावर काटा आणणारा प्रकार परिसरातील नागरीक बघत होते.एका व्यक्तीने सदर प्रतिनिधीला घरात घेतल्याने अखेर त्यांचा जीव वाचला…मात्र ही गाय या मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्याचा पिच्छा करत होती.दरम्यान या गायीने ट्युशन ला जाणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या स्कुटीचा पिच्छा केला…त्या विद्यार्थिनिने जीव मुठीत घेऊन गाडीसह धूम ठोकल्या मुळे तिचा जीव वाचला…

    ही मोकाट गाय कुणाच्या मालकीची आहे?तिचे मानसिक संतुलन बिघडले आहे का?या गायीच्या हल्ल्यात एखादा अपघात किंवा कुणाचा जीव गेल्यास जबाबदारी कोणावर..? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून पालिका प्रशासनाने तात्काळ या गायीला कांजीत टाकून मालकावर गुन्हा नोंद करावा अशी परिसरातील नागरिकांनी मागणी केली असून,या परिसरातून दुचाकीने ये-जा करणाऱ्यांनी या गायीचा बंदोबस्त होई पर्यंत सावधान असावं,असे आवाहन कॉलेज कट्टा टीमच्या वतीने करण्यात येत आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here