ध्वज दिनानिमित्त राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाकडून १०,০০० रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्त

0
59

कॉलेज कट्टा

ठाणे : सशस्त्र सेना ध्वज दिवसाच्या निमित्ताने राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ, ठाणे जिल्हा यांच्या वतीने भारतीय सैनिकांसाठी एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत दहा हजार रुपयांचा धनादेश आज ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना सन्मानपूर्वक सुपूर्त करण्यात आला.

सैनिकांच्या कल्याणासाठी योगदान देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ध्वज दिनानिमित्त संघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वेच्छेने रक्कम जमा करून हा निधी तयार केला. जिल्हाधिकाऱ्यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून संघाने दाखविलेल्या संवेदनशीलतेबद्दल आभार व्यक्त केले.

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या ठाणे जिल्हा समितीच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत असून, समाजाच्या हितासाठी संघ सातत्याने कार्यरत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here