बाबासाहेब….

0
110

माय बाप जनांचा
नेता तु दलितांचा
कैवारीदिन दुबळ्यांचा
शिल्पकार घटनेचा
तु मायबाप जनांचा—-
देऊनी सन्मान तु, पशुवत माणसाला
हटवूनि अंधार तु ,प्रकाश आम्हा दावीला
अधिकार दिला तु, अबला नारीला
उखडूनि टाकिले तु मनुवादी रुढीला
मार्गदाता ठरला तु दिनांचा—-
धम्मदान केलेस तु ,लाखो जनतेला
ऊसळला जण सागर ,नागपूर दिक्षाभुमीला
आबाळ वृद्ध आले होते, धम्मदिक्षेला
सोन्याचा दिन हा, इतिहास तु घडविला
भिमराया तुच ठरला, तारणहार आमुचा—–
चवदार तळे तु केले खुले ,मानवासाठी
काळाराम मंदिर दिले ,आम्हा न्यायासाठी
संविधान लिहीले तु ,जनकल्याणासाठी
महामानवा रात्रंदिन झटला तु ,समाज उध्दारासाठी विचार कधी ना केलास तु संसाराचा—-
सुनंदा गवई, भद्रावती
जि. चंद्रपूर
मो. नं.9860076998

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here