लोक कलावंत समितिची सांगलीत आढावा बैठक संपन्न

0
48

कॉलेज कट्टा न्यूज सांगली-
सांगली जिल्ह्यातील कवलापूर गावांमध्ये आढावा बैठक घेण्यात आली . त्या बैठकीमध्ये अखिल भारतीय लोककलावंत समितीच्या अध्यक्ष सारिका ताई उराडे उपस्थित होत्या. तसेच समितीच्या सचिव कोमल ताई पारोधी ह्या सुद्धा उपस्थित होत्या. आणि झाडीपट्टी मध्ये नावाजलेल्या मिस टिना उराडे हे सुद्धा उपस्थित होत्या. या बैठकीला पाच पिढ्यापासून लोककला तमाशा जिवंत ठेवणारे ज्येष्ठ कलावंत खाडे काका आणि पुण्याहून बालगंधर्व मिठू दादा सभेला आवर्जून उपस्थित होते.बैठकीचे आयोजन चंद्रकांत पाटील सांगली जिल्हा प्रमुख यांनी केले.व सूत्रसंचालन कुमार वाघमारे यांनी उत्कृष्ट रित्या केले. बैठकीमध्ये कलावंतांच्या समस्या विषयी सर्वांशी सांगोपांग चर्चा करण्यात आली . कलावंतांच्या खचलेल्या मनाला जागृत करून आपल्या हक्कासाठी लढण्याची ताकद समितीच्या बळावर निर्माण करून आपले हक्क मिळवून घेऊ,असे मार्गदर्शन सारिका ताईने केले. त्यानंतर सांगली जिल्ह्याची शाखा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here