सुधीर मुनगंटीवार नावाची तोफ सभागृहात गरजते तेव्हा…

0
87

 

कॉलेज कट्टा नागपूर-(नरेंद्र सोनारकर)
मंत्रिपद मिळालं नाही म्हणून निराश होऊन गप्प न बसता आपल्या निर्वाचन क्षेत्रासाठीच नव्हे राज्यातील जनतेच्या,शेतकऱ्यांच्या,विद्यार्थ्यांच्या,गरीब कष्टकरू,कामगारांच्या,महिला भगिनींनाच्या समस्या शासन दरबारीं अविरत आणी सातत्याने मांडणारा,आणी त्यांच्या हक्कासाठी भांडणारा झुंजार लाडका नेता म्हणून ज्यांची राज्यात ख्याती आहे अशा सुधीर मुनगंटीवार यांच्या सभागृहातील अभ्यासपूर्ण भाषणा मुळे संबंधित विभागाच्या मंत्र्यांना घाम फुटतो. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर काय उत्तरे द्यावीत?याची जुळवा जुळव त्यांना करावी लागते…

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाताही ही तोफ प्रचंड गर्जना करणार असा सुतोवाच त्यांच्या पहिल्याच भाषणात् सिद्ध झाला.सुधीर मुनगंटीवार हे भाजप मधील दुसऱ्या फडीचे सर्वात मोठे अभ्यासू,उच्चशिक्षित आणी अनुभवी नेते आहे.त्यांची नेतृत्वशक्ती,त्यांचा दूरदृष्टीपणा प्रत्येक विषयावरचा त्यांचा आकडेवारीसह अभ्यास भल्या भल्यांना अचंबित करून सोडतो…त्यांच्या याचं नैसर्गिक ताकदीपुढे नतमस्तक झालेल्या त्यांच्याच पक्षातील काडीबाजांनी त्यांना रोखण्याचा जणू चंगच बांधला आहे.पण वादळाला रोखता येईल का? तोफेतून निघालेल्या गोळ्याला कोण कसे टोलवेल…? अलीकडे शासनाची कानउघडणी करणारे मुद्दे विरोधी पक्षाकडे नसतील तेवढे जनहिताचे मुद्दे घेऊन ही तोफ सातत्याने गर्जत आहे…

नागपुरातील हे हिवाळी अधिवेशन सत्ताधारी लवकरच गुंडाळण्याच्या तयारीत असले तरी विरोधी पक्षापेक्षा दस्तूर खुद्द सत्ताधारी भाजप ने मुनगंटीवारांच्या प्रश्नाचीच जास्त धास्ती घेतली आहे.या एकूण प्रकाराने मुनगंटीवार यांच्याकडे कोणतेही मंत्री पद नसले तरी ते भारी होत असल्याची प्रचिती राज्यातील जनतेला येत आहे…

  • ही तोफ कधीच थंड न पडता राज्यातील जनतेच्या हक्काच्या लढाईसाठी अशीच गर्जत राहो यासाठी कॉलेज कट्टा टीम त्यांना कोटी कोटी सदिच्छा देत आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here